Skip to main content

महिलांसाठी आनंदाची बातमी...

लेखक अवलिया
Published on गुरुवार, 04/11/2010
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :) नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार मंत्रिमंडळाने महिला अत्याचार विरोधी कायद्याला (Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 2010 ) मंजुरी दिली असुन पुढिल कारवाई लवकरच होणार आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी अनेक स्त्रियांना आपल्या पुरुष सहकार्‍यांकडुन अपमानास्पद वागणुक मिळते. या कायद्यामुळे त्याचे समुळ उच्चाटन झाले नाही तरी किमान पायबंद बसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. मनुष्य शिकला पण सुसंस्कृत झाला नाही असे आपल्याला आजुबाजुला पाहिले की दिसते. परस्त्री मातेसमान मानावी असे हिंदू धर्मातील अनेक पंथांचे म्हणणे असते.

’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’

Published on गुरुवार, 04/11/2010
नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा. ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!

मराठी वृत्तवाहिन्यांचे केविलवाणे मराठी..

लेखक पंख
Published on गुरुवार, 04/11/2010
बर्‍याच दिवसांपासून हि गोष्ट खटकतच होती.. "माझा", "आयबीएन", "२४ तास" आदी मराठी वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारे मराठीचे धिंडवडे काढले जात आहेत ते पाहून ऊबग आला आहे.. विशेषतः क्रिडाविषयक, त्यातही क्रिकेटविषयक बातम्या देताना या वाहिन्यांचे ईंग्रजीचे काय प्रेम ऊफाळून येते कुणास ठाऊक.. मराठीत अगदी छान प्रतिशब्द असताना यांना ईंग्रजाळलेले मराठी बोलण्यात फार मोठेपणा वाटत असावा..

माझे साक्षात्कारी बद्धकोष्ठ

लेखक मूकवाचक
Published on गुरुवार, 04/11/2010
तसा मी लहानपणापासूनच वेगळा. ज्ञानमार्गी! तर्कसम्राट, पुरोगामी आणि बुद्धीनिष्ठ. खा खा खाणे आणि बसून राहणे या माझ्या सहज प्रेरणा. धोंडो म्हणतात "सहज प्रेरणांचे दमन विकृतीचे एकमेव कारण आहे". मी कधीच तसले दमन केले नाही. आमचे तात्या "हलका, सुपाच्य आहार घे. नियमित व्यायाम कर. " असे जुनाट रूढीवादी सल्ले देत. मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. अपचनाच्या एका विलक्षण गर्तेत सापडलो. पोट सतत जड, मन सतत अस्वस्थ. आत्महत्येकडे प्रवृत्त! धोंडो म्हणतात "अनारोग्य महत्वाकांक्षेचे सुप्त कारण आहे. ते टाळण्यासाठी माणूस मोठमोठे झमेले उभे करतो, किंवा आत्मघात करतो ". मी जिवंत राहिलो.

(पुन्हा टवाळी)

Published on गुरुवार, 04/11/2010
प्रेरणा - प्राजु यांची शुभेच्छापर कविता 'पुन्हा दिवाळी'. वळवळती त्या जिभा, गुलाबी कट्ट्यावरती संध्याकाळी चुगल्या, लफडी, गॉसिपमधुनी मुक्त चालु दे पुन्हा टवाळी कुणी कुणाच्या खोलीमधुनी.. ओल्या नवथर सोनसकाळी सलज्ज लपुनी आले निघुनी, विचारते बघ पुन्हा टवाळी सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा!
काव्यरस

पुन्हा दिवाळी..

लेखक प्राजु
Published on गुरुवार, 04/11/2010
लखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी मांगल्याचे समृद्धीचे, गीत छेडते पुन्हा दिवाळी.. चमचमती ते बिंदू ओले.. ओल्या नवथर सोनसकाळी सलज्ज हिरव्या तृणांवरती, विसावते बघ पुन्हा दिवाळी सजून जाते अंगण अवघे, रंग रंगूनी फ़ुले कळ्यांनी दारी तोरण ऐश्वर्याचे, लावून जाते पुन्हा दिवाळी अभ्यंगाची लज्जत ऐसी, गुलाब, चंदन, घेत ओंजळी आणि प्रीतीचा दरवळ न्यारा, घेऊन येते पुन्हा दिवाळी प्रेम-मायेचा झरा वाहू दे, परमेशा!
काव्यरस

WWIEF केप टाऊन नवीन

Published on गुरुवार, 04/11/2010
नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज मिपावर लिहितो आहे. माझ्या एका प्रकल्पावर काम सुरु असल्याने लेखन करता आले नाही तरीही एखादी तरी चक्कर मिपावर असतेच. असो, वर्ल्डवाईड इनोव्हेटीव एज्युकेशन फोरम 2010 साठी माझी निवड केप टाऊन येथे झाली होती. दिनांक 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. संबंधित फोरमसाठी देशातून ९ प्रकल्प निवडले होते. त्यात महाराष्ट्रातून माझा एकट्याचा प्रकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. सदरील स्पर्धा ही वर्ग अध्यापनात संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयी असते. सदर स्पर्धा देशपातळीवर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आयोजीत करीत असते.

सिमरन...

Published on बुधवार, 03/11/2010
दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे.