Skip to main content

(पुन्हा टवाळी)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 04/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - प्राजु यांची शुभेच्छापर कविता 'पुन्हा दिवाळी'. वळवळती त्या जिभा, गुलाबी कट्ट्यावरती संध्याकाळी चुगल्या, लफडी, गॉसिपमधुनी मुक्त चालु दे पुन्हा टवाळी कुणी कुणाच्या खोलीमधुनी.. ओल्या नवथर सोनसकाळी सलज्ज लपुनी आले निघुनी, विचारते बघ पुन्हा टवाळी सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी चिकट गोड भावुकता जावो, मस्त चालु दे पुन्हा टवाळी!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4468
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

टवाळी फारच मस्त! (टवाळखोर)बेसनलाडू

शब्दबद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मिपावरील सर्वांनाच ही टवाळी आवडो. टवाळीला शिघ्रपणे प्रसवायच्या प्रयत्न असूनही विडंबण परिपक्व झाले आहे असं वाटलं. कुठेही शब्दांची खेचाखेच झालेली नाही. या प्रकारच्या विडंबणात भावनेपेक्षा शब्द महत्त्वाचे, ते पोचले.

आवडले .अतिशय. आमचं हे पावशेर बी गोड मानून घ्या. टवाळदेशी टवाळ वसती , घुमो टवाळी तिन्ही त्रिकाळी, दंतमौक्तिके काळी पिवळी , तयास लाभो नवी झळाळी, ठसके लागो ,पोट दुखू दे , जबडे हाडे सुखद खळाळी, सट्वाईने हास्य कोरले , जन्मापूर्वी इथे , कपाळी .

In reply to by अडगळ

जबडे हाडे सुखद खळाळी, सारख्या ओळींतून, ळकाराच्या खळखळीतून नादमाधुर्य छान साधलं आहे. शेवटच्या ओळीच्या रचनेतून मर्ढेकरांच्या 'या कढईच्या कुट्ट कपाळी ठोकुन पक्के, काळे बळकट' या ओळींची काहीशी आठवण झाली.

मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी चिकट गोड भावुकता जावो, मस्त चालु दे पुन्हा टवाळी! मस्त.......! -दिलीप बिरुटे

गुर्जी बॅक इन फॉर्म! मस्त आहे विडंबन!!

सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी वा, वा, सुंदर! इथे तुम्हीही अगदी मूळबरहुकूम गल्ली चुकलां आहांत! बेष्ट!!!!! :)

मस्त आहे विडंबन! >>हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी >> परमेश, म्हंजे देवबाप्पा का? आकाशातला? बरं बरं! :)

नुसतंच विडंबन.. टवाळक्या करायला तर कधी येत नाहीत..आणि नुसतं विडंबन टाकतात. काय उपेग गुर्जी? ;)

In reply to by धमाल मुलगा

बरेच दिवसात स्वयंपाक केला नाही सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न!

In reply to by सहज

आत्ता अंमळ ट्युब पेटली. (काय करणार, सरकारी ट्युबलाईट है.) अहो, पण पथ्य केव्हाच उलटली की. आता काय? आणि पथ्यं पाळताना पथ्यही पाळावं लागेल ना?

In reply to by धमाल मुलगा

पथ्य उलटली ... छ्या, अगदीच ब्वॉ तुम्ही हे!!

In reply to by धमाल मुलगा

काय उपेग गुर्जी? उपेग म्हणणे स्मॉल की पतीयाळा?????

घासुगुर्जी हे पुणेद्वेष्टे असले तरी आमचे आप्तस्वकीय असल्याने हा धागा उघडला. छान केले आहे विडंबन. पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन करणे योग्य आहे का असा प्रश्न पडला. परालिया चाचा

In reply to by परिकथेतील राजकुमार

हेच म्हणतो. >पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन अहो पुदुकाका* बहुतेक 'हिरवे' ह्या कॉमन फॅक्टर मुळे तसे चालून जात असावे. ;-) * पुदु - पुण्याचे दुकानदारकाका

In reply to by परिकथेतील राजकुमार

आप्तस्वकीय शब्द काळजाला भिडला.
पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन करणे योग्य आहे का असा प्रश्न पडला.
विडंबन लिहून झाल्यानंतर, एक सामान्य सदस्य म्हणून ते वाचल्यानंतर तोच प्रश्न आम्हासही पडला आहे. कोणास उत्तर सापडल्यास कळवावे.

मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी गुर्जींच विडंबन मला मिसळपाव खायला घेउन गेलं...

मस्त