Skip to main content

हशा- खास कोल्हापुरी

लेखक रन्गराव
Published on मंगळवार, 09/11/2010
संतोष शिंदे ह्या कलाकराच्या हास्य सम्राट ह्या कार्यक्रमातील ह्या दोन चित्रफिती १. पुरूषप्रधान संस्कृती - http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M २. कोल्हापुरी भाषेची वैशिष्ट्य- http://www.youtube.com/watch?v=nPYkO4Tj9M0

पुडाच्या वड्या--

Published on मंगळवार, 09/11/2010
साहित्य:- दोन जुड्या कोथिंबीर, एक वाटी खिसलेले सुक्के खोबरे, अर्धी वाटी पांढरे तिळ, गोडा मसाला दोन टे. स्पुन, मिठ , साखर दोन टे.स्पुन. चिच कोळ अर्धी वाटी,तळणीसाठी तेल. पारीसाठी-- बेसन पिठ एक वाटी, कणीक अर्धी वाटी, तेलाचे मोहन कडकडीत एक डाव.अर्धा टे.स्पुन हळद, मिठ एक टी.

चालता डौलात तू ग -

लेखक विदेश
Published on मंगळवार, 09/11/2010
चालता डौलात तू ग, मी असे न्याहाळले- का कुणाला वाटले मी कैक प्याले रिचवले ! खरडुनी अपुला गळा तू गीत कोमल गाइले- छान ! कळले नाहि तुज, मी कर्णयंत्रा काढले ! मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी- वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले ! इकडुनी जातेस तिकडे- तू जरी हळु चंचले- भासती भूकंप भारी भूतलावर जाहले ! चंद्र तुझिया चेह-यावर छान कोणा भासतो- डाग मुखकमलावरी ते पाहुनीया मानले !

-आह..हिअर वुई गो....!!

लेखक गवि
Published on मंगळवार, 09/11/2010
-वॉच इट.. -वुई आर फिनिश्ड.. - पीट..सॉरी.. -हे व्हॉटस हॅपनिंग हियर? -देअर ही इज..लूक एट हिम...गॉडडॅम्ड दॅट सन ऑफ बिच इज कमिंग. गेट ऑफ.. -मा आय लव्ह यू.. -हिट द वॉटर..हिट द वॉटर...हिट द वॉटर...!!! - ओह फक. धिस कान्ट बी..!!! -दॅट्स इट..आय एम डेड.. -देअर इट गोज..देअर इट गोज..ओह नो..!! -एमी, आय लव्ह यू..!! -माउंटन्स ..!!!!! - आआआ ..अल्लाह अकबर.. -ओह माय गॉड !

एक चारोळि प्रत्येक आई साठी,,

Published on मंगळवार, 09/11/2010
पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ? जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू? तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ? तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??...

मासे १६) मांदेली

लेखक जागु
Published on मंगळवार, 09/11/2010
हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश हे मला सुचलेल नाव (फिशटॅकमधील नव्हे. नाहितर त्यावरुन वादाच्या पोस्टी पडतील). ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात. मांदेली तळण्यासाठी मांदेली हवी तेवढी. हिंग हळद मसाला मिठ लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण तेल तळण्यासाठी प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची.

इसवी सन ३०१०

लेखक अवलिया
Published on मंगळवार, 09/11/2010
भाषा सतत बदलत असते असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची भाषा ते तुकारामाची, रामदासांची भाषा ते आगरकर, सावरकर, पुल ते आज आपण तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा.. सतत बदल झाला आहे, होईल. नव नवे शब्द दुसर्‍या भाषेतले येतात, येतील, नवे शब्द तयार होतात, होतील. वीस वर्षांनी वळुन पाहिले की भाषा खुप बदललेली दिसते. मी इथे फक्त प्रमाणभाषा (जिच्यात साधारणपणे लेखन केले गेले आहे तिच्याबद्दल बोलत आहे) डोळ्यासमोर ठेवुन बोलत आहे. तर मंडळी कल्पना करा की इसवी सन ३०१० चालु आहे. होय आजपासुन १००० वर्षांच्या भविष्य काळात आपल्याला जायचे आहे...

डाव्या शेपटीचा मारुती

Published on मंगळवार, 09/11/2010
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , डाव्या शेपटीचा मारुती आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या शेपटीच्या आणि उजव्या शेपटीच्या मारुतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय?

मिसळीचे चित्र परत......

लेखक सविता
Published on मंगळवार, 09/11/2010
बर्‍याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले..... इतके बरे वाटले ना!!!! तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये......

दिवाळी किल्ला - किल्ले राजगड !!!

Published on मंगळवार, 09/11/2010
दिवाळीतील इतर गोष्टींबरोबर किल्ला बनवणे हा की एक आनंदाचा भाग असतो. सांगलीतील कलाकार - आदित्य आणि श्रीराम ओगले यांनी बनवलेला हा राजगड आपल्याला कसा वाटला ते सांगा अमोल केळकर ----------------------------------------------- मला इथे भेटा -------------------------------------------------