Skip to main content

मासे १६) मांदेली

लेखक जागु यांनी मंगळवार, 09/11/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश हे मला सुचलेल नाव (फिशटॅकमधील नव्हे. नाहितर त्यावरुन वादाच्या पोस्टी पडतील). ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात. मांदेली तळण्यासाठी मांदेली हवी तेवढी. हिंग हळद मसाला मिठ लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण तेल तळण्यासाठी प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.) आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा. तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा. तव्यातुन गरम गरम काढलेली मांदेलींचा फडशा पाडा. अधिक टिपा : अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते. काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून). ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.

वाचने 16961
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

तीव्र निषेध..! तुम्हाला मिपावरच काय, परंतु मराठी आंतरजालावर कुठेच लिहायची परवानगी नसावी..! तात्या.

क्या बात है!
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते.
+१, वर दिलेल्या कृतीप्रमाणे किंवा पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या खोबर्‍याचे दबदबीत कालवण. हा धागा आठवला :)

हा लेडी फिश ना? काय म्हणतात बर मुडदुशी? माझी मुल खायला लागली की बस तेव्हढच जेवण होत त्यांच. काय चव असते या माशाला, उद्या आणते आता.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील . ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल. उगा साम्गायला गेल तर टांगायला नको नेउ.

In reply to by स्पंदना

आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील . अहो जल्ला मेला म्हणजे कुनाला जालायचा नाय काय. तां एक अशी बोलायची रीत असता. ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल. मिपा वर थोडे दिस राहा आनी अशे धागे वाचीत रहा, PhD होऊन जाईल आपोआप. जल्ला हाय काय आनी नाय काय. बाकी घाटावरच्या थोड्या रेशिप्या पन टाका की आमच्यासाठी.

In reply to by सुनील

एव्हढा मसाला लावुन ठेवल्यावर कसे बाइ दिसतील ते? त्या पेक्षा खाउन उरलेले काटे अन शेपट्या दाखवायच्या ना? मग ओळखले असते!

In reply to by यशोधरा

कोंकण - गोवा - मुडदुशे कारवार - नगली (नोगली) मंगलोर - काने इंग्रजी वळणाची भारतीय हाटेले - लेडी फिश

धन्य ती जागू ताई...आणि धन्य ते मासे ... कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत.... तुला तर आता एक अवार्ड द्यायला हव खर तर... समुद्रातले , तळ्यातले , नदीतले सगळे मासे तुझ्या परिचयाचे झाले असतील नाही का ;-)

In reply to by मनि२७

>>कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत.... हॅ हॅ हॅ.. मासे माहित असायला किनार्‍यावर असायला लागतं, भारताच्या मध्यभागी आणि उत्तर भारतात ते कशाशी खातात हे सुद्धा माहित नसते.

विसोबा :smile: नंदन धागा छान आहे. मराठमोळा धन्यवाद. अपर्णा नविन नाव कळल तुमच्यामुळे. मनी अ‍ॅवॉर्डच नाव काय द्याल ? बाकी धन्स हो एवढी स्तुती केल्याबद्दल.

झकास!!

मांदेली आवडते कारण त्याच्या सोबतीने बोंबिल घरात येत. नुसती मांदेली तितकीशी आवडत नाही. मांदेलीचं आंबट-तिखट सॉल्लिड!! जागु रॉक्स!

In reply to by प्रियाली

>> जागु रॉक्स! असेच म्हणतो !!

अहाहा!! चांगली खरपूस तळलेली मांदेली बियरसोबत घ्यावी! आता पापलेट, सुरमई, रावस अश्या "राजेशाही" माशांच्या तुलनेत मांदेली जरा डाउन मार्केट मासळी. पण चवीला जबरा!

हे असेच चालत राहिले तर माझ्या शाकाहारी बाण्याचे कठीण आहे ब्वॉ. मी गणपाभौचा, दिपालीतैचा, जागुतैचा एकही पाककृतीचा धागा उघडायचा नाही असं ठरवलेलं असतं. पण जेव्हा धागा दिसतो तेव्हा सारखं लक्ष तिकडे जात असतं. मग म्हणतो, फक्त फोटू बघून घेऊ. केव्हा खालचे प्रतिसाद हळूच वाचून होतात ते समजतही नाही. कधी कधी मात्र अगदी राहवत नाही अन् प्रतिसाद द्यावाच लागतो... तुम्ही लोक अक्षरशः महाआआआआआआआआन आहात... _/\_ :)

दिपालि, दिपक, स्वाती, प्रियाली, संदिप, चित्रा, राघव, धन्यवाद. सुनिल पण हे छोटे मासेच खुप चविष्ट असतात.

छान धागा. मांदेली हा एक स्वस्त आणि मस्त मासा आहे. खोबरे घालून सुके करा किंवा नुसते तळा, उत्तम लागतात. मात्र तळले तर त्याच दिवशी संपवावेत (कुठलेही मासे). सौम्य चवीच्या माशांना तळताना आले-लसणाची पेस्ट लावू नये, मूळ चव दबते त्यात. नुसते मीठ, हळद आणि तिखट यात स्वर्ग उभा राहतो. पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे. जागुताई, सुरमई तळली तर वास नाही येत (ताजी असेल तर), बांगड्याला मात्र येतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे.

सुनिल मग शिरच्छेद केलेले फोटोही चालतील. त्या लिंकमधे मसाला लावल्यामुळे काहीच कळत नाही. विश्वनाथ तुमच बरोबर आहे. पण सुरमईला थोडा वास येतोच असा माझा अनुभव आहे. कदाचित माझ्या मनातच तो वास बसला असेल.

अप्रतिम छान लिहीता हो.काय बोलू? आतापर्यंत मासे आणायल गेलं की सुरमई किंवा पापलेट घेउन परतायचो.मग "परवडत नाही..परवडत नाही.." म्हणत बसायचं.इथे तर तुम्ही खजिना उघडून दिलाहेत.झकास हो एकदम. धन्यु.

In reply to by जागु

काट्यांचे प्रमाण काय ? चावून पचवण्यासारखे बारीक की हाडेसदृश मोठ्मोठे ? अर्थात एकूण माश्याचाच साईझ छोटा दिसतोय त्यामुळे ते बारके बारके असतीलसं वाटलं. ते घासाघासाला मध्यम आकाराचे काटे आले की मग मजा येत नाही. चावून टाकता येत नाहीत आणि सारखे काढत बसावे लागतात तोंडातून.

In reply to by गवि

मान्देलीला एक मोठा काटा असतो (अर्थात मुळात मासाच छोटा असल्याने तो काटा पण फार मोठा नसतो). या खेरीज काही छोटे काटे असतात पण त्याचा फार त्रास होत नाही. मांदेली तळली असेल तर मान्देलीचा शेपटीकडचा भाग काट्यासकट खाता येतो. अर्थात काटे पूर्ण टाळायचे असतील तर छोट्या माशांकडे वळूच नये. पापलेट, सुरमई,हलवा आणि रावस बस झाले. पुर्व भारतात गेलात तर रोहू आणि हिल्सा :-)

In reply to by जागु

यक्क.. :-( बादवे.. अहो आम्ही कोंकणात राहून मासे खाणे अडाप्ट केले आहे. जन्मतः घरंदाज मासेखाऊ नसल्याने काट्यांची अडचण येते..म्हून विचारलं.