Skip to main content

चिंब

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 27/12/2021 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
वृक्ष जसा - अंकुरण्या आधी बीजस्वरूपी अस्फुट असतो बाण जसा- सुटण्याच्या आधी प्रत्यंचेवर सज्ज राहतो मंत्र जसा - स्फुरण्याच्या आधी बीजाक्षरी निद्रिस्त राहतो अर्थ तसा उलगडण्या आधी शब्दांच्या निबिडात राहतो ओथंबून मग येतो अवचित कोसळतो अन् चिंब भिजवितो
काव्यरस

गुजरात सहल २०२१

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 27/12/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठ वर्षांपासून आमच्या 'हिवाळी सहल ग्रुप' ची सहल नोव्हेंबर अखेर किंवा डिसेम्बरची सुरुवात या काळात होत असते. (अपवाद सन २०२०) संपूर्ण ग्रुप जवळच्या नातेवाइकांचाच असून बहुतेक पुरुष मंडळी शेती व्यवसायाशी निगडित आहेत. महिला प्रत्यक्ष शेतात राबत नसल्या तरी शेतीविषयक व इतर घर कामांमध्ये खुप व्यस्त असतात. वर्षातून ८-१५ दिवस कुठेतरी निवांत मिळावेत इतकीच त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी त्यांना सोबत घेऊन जाणारे कोणीतरी पाहिजे होते तो पुढाकार आम्ही घेतला व गेल्या आठ वर्षात वेगवेगळ्या राज्यात हिवाळी सहली केल्या. आता पुढची पिढी घर व व्यवसाय इ.

चका-या

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 25/12/2021 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
  'माझ्या मामाची रंगीत गाडी  हो| तीला खिल्लार बैलाची जोडी हो|| अशी कविता शाळेतल्या पुस्तकात होती.आजोळ शहरात असल्याने मामाच्या घरी बैल,गाडी वगैरे नव्हते. आमच्या कडे गावी बैलगाड्या होत्या.पण रंगीत नव्हत्या. साध्या होत्या.बैल खिल्लार नव्हते.साधे,गावरान होते. आमच्या घरी  कुठल्याही वस्तूचे असणे,चैनीसाठी वा षौकासाठी नाही तर त्याची उपयुक्तता किती या निकषावर असे.बैल खिल्लार हवे,गाडी रंगीत हवी असा आग्रह नसे.काम होण्याशी मतलब.   शेतीकामात बैल आणि गाडी बहुपयोगी.

Christmas Special – गोव्यातील अनोखे संग्रहालय

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 25/12/2021 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी महासागरातील भारताच्या राष्ट्रहितांच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल पाण्याखाली, पाण्यावर आणि समुद्रावरील आकाश अशा तीनही ठिकाणी सक्षमपणे पार पाडत आहे. यापैकी समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची संपूर्ण ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरते. भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना 1958 मध्ये झाली. तेव्हापासूनच्या या शाखेच्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणी या संग्रहालयात जागृत ठेवण्यात आलेल्या आहेत. बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानातील चितगाँग आणि कॉक्स बाजारावर हवाई हल्ले केले होते.

शरदोत्सव !

लेखक Bhakti यांनी शनिवार, 25/12/2021 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
१. वसंतोत्सव २.ग्रीष्मोत्सव ३.वर्षा परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते.

मनोनाट्य

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 24/12/2021 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर.

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग २ {३००किमी }

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 24/12/2021 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
३०० किमी करायचे ठरवले पण त्यासाठी रूट ठरेना. सावंतवाडी क्लब चा सावंतवाडी - राजापूर - सावंतवाडी असा रूट होता. तर नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट या क्लब चा वाशी - महाड - वाशी असा रूट होता. सांगली आणि पुणे क्लब चे पण रूट चेक केले. शेवटी या दोन रूट पैकी कुठचा फायनल करायचा हे ठरत नव्हतं. खारेपाटण खूप दमवणारा होता त्यामुळे परत त्याच रूट वर जायला मन धजावत नव्हतं. पण तिकडचे रस्ते सगळे चकाचक होते. तर मुंबई गोवा हायवे रत्नागिरी पर्यंत प्रचंड खराब आहे याची माहिती होती. तरीही बरीच चौकशी केली.

प्रेम आणि द्वेष

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/12/2021 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि द्वेष . उद्यानातील कोपऱ्यात असलेल्या त्या निष्पर्ण ,निर्जीव आणि निरुपयोगी झाडाकडे आता कोणीही बघत नव्हते. ते उद्यान सुद्धा आता कुलूप लावून बंद केले होते. काही दिवसापासून अगदी अघोरी वाटाव्यात अश्या घटना त्या झाडा भोवती होत होत्या. काही दिवसापूर्वी एकाएकी ते सुंदर झाड वाळायला लागले. सगळी पाने गळून गेली. सगळी फळे सुकून गेली . आणि एक उग्र वास त्या झाडाच्या अवती भोवती पसरला. आपल्या जवळ कुणीही येऊ नये अशी त्या झाडाची योजना असेल का ? कुणास ठाऊक पण अगदी ..परवा परवा पर्यंत कसे छान बहरलेले होते ते झाड !... कसली तरी छोटीशी लाल चुटूक फळे लागायची त्याला.

सडा अठवणींचा

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 23/12/2021 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
सडा अठवणींचा बकुळीच्या झाडाखाली सडा अठवणींचा पडला तुझ्या नी माझ्या अव्यक्त प्रेमाचा गंध की रे मुरला किती केली फुले गोळा किती ओवल्या तीथेच माळा सख्या तुझ्या वियोगच्या इथेच लागल्या रे झळा आली प्रेमाची झुळक सांगितला तीने निरोप जीव एकवटून सारा तन, मन धावले तडक नका बघू दिवास्वप्ने नका मनोमनी जळू दर तीन महिन्यांनी इथेच यायचा कल्हईवाला काळू -कसरत २४-१२-१९६५
काव्यरस

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}

लेखक मालविका यांनी बुधवार, 22/12/2021 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी} SR अर्थात super randonneur. खरं तर हे स्वप्न श्रीनिवासच. जानेवारी २०२१ ला ६०० किमी ची BRM करून त्याने ते पूर्ण देखील केलं. आणि मग हा किडा त्याने माझ्या डोक्यात सोडला. मागच्याच वर्षी त्याच्याबरोबर २०० नि ३०० किमी BRM मी केल्या होत्या. अर्थात तेव्हा दोघांनी चालवायची Tandem सायकल वरून हा प्रवास आम्ही केला. नंतर औरंगाबाद ला ६०० किमी चा प्रयत्न केला पण अर्ध्यात ती स्पर्धा सोडून दिली आणि तो नादच सोडून दिला. पण असा ऐकेल तो श्रीनिवास कसला? पूर्ण पावसाळा जवळपास "खूप पाऊस आहे आज नको सायकलिंग "या नावाखाली काढला.