मनोनाट्य
कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर. हा डॉक्टर पटला नाही तर कि तो डॉक्टर. दुष्टचक्रात अडकायच. सगळे मेले लुटायलाच बसलेत. इथेतर बकरा स्वत:हून येतोय. त्या आरोग्य पुरवण्या वाचल्या की प्रत्येक रोग आपल्यालाच झाला आहे असे वाटायला लागते. मी नाही वाचतं हे असल काही! स्वत:चे फाजील लाड करायचे नाहीत. भरपुर पैसा कमवावा.भरपुर खर्च करावा. कशाला आंथरुण पाहून पाय पसरायचे? आंथरुण वाढवा ना! आनंदी जगावं. मौजमजा करावी. काही केमिकल लोच्या वगैरे नसतात. सायकियाट्रिस्ट लोकांनी पसरवलेल खूळ आहे.हे सगळे रिकमटेकड्या मनाचे खेळ आहेत. खाजवायला फुरसत नाही मिळाली की सगळं बरोबर होतय. हातावर पोट असणार्यांना होत का काही? झक्कत रोज काम कराव लागतं. त्यांना बर काही होत नाही? असल्या फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही सगळी नाटकं संपन्नतेची देणगी आहे. पैसा जास्त झाला की मग असले उद्योग सुचतात. आम्हा बायकांच बर असत. त्या निसर्गत:च चिवट असतात परिस्थितीशी तोंड द्यायला. घरचंही सांभाळायच शिवाय बाहेरचही पहायचं.मी शेवटपर्यंत काम करत राहणार. पैशापरी पैसा मिळतो शिवाय वेळही मजेत जातो. वेगवेगळी माणसे भेटतात आमच्या धंद्यात. तुमच्या त्या व्याखान, चर्चासत्र, वेबिनार यात काय ते पुस्तकी किडे सांगणार? नुसते अकॅडमिस्ट! व्यवहारात शून्य! असो! मला फालतू वेळ नाही. भरपूर कामे पडली आहेत.
वाचने
4170
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आँ...
एकदम मस्त ! +१
💖
या धाग्यातल्या बाईचं म्हणण, तेच ओंकारचं
In reply to या धाग्यातल्या बाईचं म्हणण, तेच ओंकारचं by चौथा कोनाडा
पाहिला दोनदा! उत्तम आहे.
घाटपांडे साहेब
काही केमिकल लोच्या वगैरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |In reply to काही केमिकल लोच्या वगैरे by मदनबाण
मदनबाण सरांशी बाडीस
In reply to मदनबाण सरांशी बाडीस by जेम्स वांड
+१
एवढं फाट्यावर का मारलं.......
आजूबाजूला पहात ऐकत अनुभवत