Skip to main content

भाजप आणि आर एस एस

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
साधन शुचितेची सतत चर्चा करणारा पक्ष म्हनून भाजपचे नाव घेतले जाते. भाजप हा एक स्वतन्त्र पक्ष असून संघाशी त्याचा संबन्ध नाही असे वारंवार सांगितले जाते. संघ भाजपची धोरणे ठरवीत नाही असेदेखील सांगितले जाते. एखादी गोष्ट भाजप ने केली की ती गोष्ट संघाने केली की भाजप म्हणजे संघ नव्हे असे देखील सांगितले जाते. भ्रष्टाचारी लोकाना संरक्षण देवू नये हे खरे पण त्यांची पाठराखण देखील करू नये. आदर्श घोटाळ्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री खुर्चीवरून पायउतार झाले . पण भाजपला कर्नाटकातील त्यांच्या मुख्यमन्त्र्यांबद्दल हे मान्य नसावे.

याद्या 7316

[नेहमीप्रमाणे ;-)] सोप्पी [पा.क्रु.] टोमॅटोची भाजी

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
काल रात्री उशीरा घरी आल्यावर, घरी फक्त पोळ्या शिल्लक असल्याने पटकन होणारी कोणती भाजी करावी असा विचार मनात आला. मग टोमॅटोची भाजी केली. तिची पा.क्रु. देत आहे. साहित्यः बारीक चिरलेला लाल टोमॅटो, बा. चि. कांदा, तिखट, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य क्रुती: कढईमध्ये थोडे तेल घेउन ते चांगले तापल्यावर त्यात थोडे मोहरी-जिरे टाकले. तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, घालून त्यावर कांदा चांगला परतला. मग त्यात बा. चि. टोमॅटो घातला. चांगला परतला. मग चवीपुरते तिखट, मीठ आणि थोडी साखर घातली. भाजी चांगली परतली :-) अशी सोप्पी भाजी तयार. [या भाजीत साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. म्हणजे ती अधिक रुचकर होते.]

याद्या 4331

हरे कबाब

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १) पालक धुवुन बारीक चिरुन १ वाटी २) मेथी असेल तर धुवुन, बारीक चिरुन १ मोठा चमचा ३) मटार १ वाटी ४) हिरवी मिरची (४-५)+लसुन (५-६ पाकळ्या) + आलं १ छोटा तुकडा एकत्र वाटुन ५) मक्याचे दाणे १/२ वाटी ६) कोथिंबीर १/२ वाटी धुवुन, बारीक चिरुन ७) हरभरा डाळ १ चमचा मोठा भिजलेली ८) कॉर्नफ्लोअर २ चमचे मोठे ९) मीठ चवीनुसार १०) धणे जीरे पुड १ चमचा छोटा ११) एक उकडलेला बटाटा १२) तीळ अथवा काजू सजावटीसाठी १३) तेल क्रमवार पाककृती: प्रथम मक्याचे दाणे व मटार उकळत्या पाण्यातुन काढुन घ्यावेत. मटार थोडे जाडसर ठेचुन घ्यावेत. हरबरा डाळ व मक्याचे दाणे मिक्सीमधुन बारीक वाटुन घ्यावेत

याद्या 4827

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18625

थिअरी

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही.

याद्या 24835

[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र

Published on सोमवार, 24/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय? संदर्भ -http://discovermagazine.com/2005/oct/sex

याद्या 1324

याद्या 5296

किल्ल्यांवरची हागणदारी...!

Published on रवीवार, 23/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2901

स्वताच्या पोटाला चिमटा घेत ...!!

Published on रवीवार, 23/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
रेतीचा अख्खा ट्रक आला कामगार फावड्याने रेती काढीत ढकलू लागले बंगल्याच्या आवारात ....
लेखनविषय:

याद्या 1986
काव्यरस