Skip to main content

सोनं

लेखक सरिता बांदेकर यांनी मंगळवार, 11/01/2022 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सोनं “अरे ए बबन्या,काय खबर मिळाली की नाही?” डुगऱ्यादादाचं डोकं गरम झालं होतं. सालं चार महिने झाले एक पण मोहिम यशस्वी नाही झाली.या लॅाकडाऊनमुळे एक तर ट्रॅफीक बंद.लोक फिरायला बाहेर पडत नाहीत त्यामुळे लूट बंद.लग्नकार्य बंद त्यामुळे बायका नटून थटून मिरवत नाहीत.रोकडा पण नाही आणि सोनं चांदी पण नाही.त्यात बार बंद मग हातभट्टीच्या पहिल्या धारेच्या कडक मालाला उठाव नाही. सालं जगायचं तरी कसं. डुगऱ्यादादा कपाळ बडवत बसला होता.बबन्या धावत धावत आला.त्याला धाप लागली होती. “ए बबन्या कुठून एव्हढा भूत बघितल्यासारखा पळत आलायस?”डुगऱ्यादादाने विचारलं. “दादा त्ये पक्क

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

लेखक srahul यांनी मंगळवार, 11/01/2022 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले.

एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 11/01/2022 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर लेखिका :वीणा गवाणकर १ साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात.

सल

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 10/01/2022 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सल - अति लघुकथा ---------------------- मैत्रिणीचा फोन आला . अन ... ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो . त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी . आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं . आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ... पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .

नाटक परीक्षण! रणांगण!

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 10/01/2022 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
या १४ जानेवारी २०२२ ला २६० वर्षे होतील ! गेली २६० वर्षे ही भळभळती जखम घेऊन प्रत्येक मराठा जगतोय. आणि या जखमेच्या वेदना मराठयांच्या पुढील पिढीत वारसा म्हणून आपोआपच येतात. मराठ्यांचा इतिहास जेव्हा पासून लिहिला जात आहे तेव्हा पासून पानिपतच्या रणसंग्रामावर अनेक पोवाडे लिहिले गेलेत, कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, अभ्यास लेख लिहिले गेलेत, अगदी अलीकडे मराठ्यांच्या इतिहासाकडे लक्ष देऊन त्यावर चित्रपट काढणाऱ्या बॉलिवूड ने तर एक चित्रपट ही काढलाय. चित्रपट हे कोणतीही घटना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे अतिशय सक्षम माध्यम आहे.

अहिल्येश्वर मंदिर

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 10/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख. नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी.

ध्रांगध्रा - ९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/01/2022 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतंय. मागील दुवा ध्रांगध्रा - ८ http://misalpav.com/node/49751 मी चाचपडत तोल सांभाळायचा प्रयत्न करतोय. इकडे यिकडे हात करताना मला महेशचा हात हाताला लागतो. मी कसाबसा उभा रहातो. डोळ्यासमोर अजूनही अस्पष्ट पण मघापेक्षा नक्कीच टळक उजेड जाणवतोय. मी डोळे हाताने चोळतो.

गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका

लेखक गोरगावलेकर यांनी रविवार, 09/01/2022 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ येथे वाचा ------------------------ आज सहलीचा तिसरा दिवस. अर्धा दिवस भूजमध्ये भटकंती करून द्वारकेसाठी प्रवास करावयाचा होता. पण अंतर जास्त असल्याने वाटेत जामनगरलाच मुक्काम करणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला नाश्ता आटोपून भुजकडे निघालो. वाटेत एका ढाब्यावर चहा घेतला. ढाब्यासमोर खाटा टाकलेल्या होत्या. माणसे येऊन बसली की लगेच प्रत्येकाच्या हातात बशी दिली जात होती व किटलीतून थेट बशीत चहा दिला जात होता. हीच पद्धत नंतर अनेक ठिकाणी दिसली. (चहा रु.१०/-प्रति बशी) चहा मात्र सर्व ठिकाणी उत्तम मिळाला.

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/01/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 08/01/2022 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा) तोरणा विद्यालय साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं. एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे