Skip to main content

मुक्तता

लेखक अभिषेक९
Published on शुक्रवार, 18/02/2011
कैद होतो मी माझ्यातचं बंदिस्त केले होते मीचं मला गुदमरलो दम कोंडला मन-मेंदूने साद घातली मुक्ततेसाठी स्वतःच स्वतःविरुद्ध बंड !! पण ध्येयाने तुतारी फुंकली मांड टाकली उधळला घोडा सिम्मोलंघन करायला!! मीच माझ्यावर यल्गार केला रक्त सांडले जख्मा झाल्या आणि मारला गेलो मला बंदिस्त करणारा मी संपलो आता उरलोय फक्त मुक्त, स्वच्छंद मी घोडा परत उधळून लावायचा आहे सूर्यास गिळायला पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला हिमालय सर करायला सौंदर्याचा आस्वाद घ्यायला आणि माझ्यातला मी प्रगल्भ करायला...
काव्यरस

गुगल चा णिषेध

लेखक टारझन
Published on शुक्रवार, 18/02/2011
आज मला गुगल विषयी एक भयाणक बातमी कळली ... आणि माझी माथ्यावी नस सणसण सणकु लागली. .. मी गुगल ला खुप शिव्या दिल्या ह्या कारणासाठी खात्री करण्यासाठी लिंक : http://translate.google.com/#en|sw|StuPidity तेंव्हा म्हैला गुगल वापरणे बंद करणार का ? हे पहाणे रोचक ठरावे. धन्यवाद

< मोर्स कोड >

Published on गुरुवार, 17/02/2011
. . . प्रेरणा एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारतातल्या सॉफ़्टवेअर क्षेत्राला आता फ़ार चांगला काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक कंपन्यांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील. त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मुख्य प्रोग्रॅमिंगची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये मोर्स कोड न विसरता लिहा. पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो.

... निरंतर ...

लेखक अभिषेक९
Published on गुरुवार, 17/02/2011
दाटलेले काळवंडलेलं भरून आलेले .... आभाळ आसुसलेली दाहलेली रुक्ष झालेली .... धरणी प्रतीक्षा करते आहे ती एखाद्या तरुणीसारखी येईन 'तो' सर्वांग चुंबेल 'तो' दाह शमवेल 'तो' सौंदर्य माझे टवटवीत खुलवेन 'तोच' शेवटी आलाच 'तो' सरसरत आला अवखळपणा त्याच्या अंगातचं होता हळुवार पणे बिलगला मादक स्पर्शाने सौंदर्य न्याहाळले मिठीत मोहर खुलवला उन्मादात तिला बुडवून टाकले 'ती' शहारली... बहरून गेली... मोर होऊन नाचली कोकिळेसारखी गायिली लहान मुल होऊन बागडली तारुण्याच्या आनंदात चिंब भिजली दिवसांमागून दिवस लोटली युगांमागून युगे अव्याहत प्रेमाचा हा वर्षाव अजून असाच आहे .... निरंतर....
काव्यरस

अमेरीकन भ्रमनिरास

लेखक गणेशा
Published on गुरुवार, 17/02/2011
आठवतात दिवस ..काही दिवसांपुर्वीचे.. नाही काही वर्षांपुर्वीचे कीती प्रफ़ूल्लीत होते ना मी ? अमेरीकेला जायच म्हणून.. उधान आल होत .. आनंदाला लग्न ठरल होत ना माझ , सगळीकडे आनंद उत्सव चालू होता मी हे बघणार, मी येथे जाणार मी हे करणार, मी थोडीशी अजून शिकणार.. सगळी स्वप्न पदराला बांधून निघाले होते मी जाताना मावेल तेव्हडा माझा 'भारत' साठ्वून घेऊन चालले होते मी .. मनात.. ह्रदयात.. पाउल ठेवले ना मी त्या स्वप्नमय दूनियेत सगळे वेगळेच दिसले मला माणसे .. (हसून) छे मशीन म्हणायच त्यांना भ्रमनिरास.. फ़क्त भ्रमनिरास.. मग साठवलेला 'भारत' आठवत होते मी .. हळू हळू काही दिवसांनी ..
काव्यरस

वर्ल्ड कप / पाकिस्तान /शिवसेना

लेखक विजुभाऊ
Published on गुरुवार, 17/02/2011
पाकिस्तान फायनला आल्यास शिवसेना वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून लावेल असा इशारा सेने ने पूर्वी दिलेला आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7513899.cms या पार्श्वभूमीवर यंदा सेनेची काय भुमीका असेल ?

ही पाककृती नाही..

Published on गुरुवार, 17/02/2011
सहजच यु ट्युब वर काहीतरी शोधत होतो..आणी हे सापडले.. अता हे यंत्र कोठे सापडेल?? ते शोधावे लागेल.. मला खुप आवडले.. तुम्हाला पण आवडेल आशी आशा आहे..

<परततीचाच प्रवास>

लेखक विजुभाऊ
Published on गुरुवार, 17/02/2011
प्रवास छान व्हावा छान असते स्वप्न फर्स्ट क्लास चा पास असतो [सेकन्ड चे तिकीत काढण्यापेक्षा तो परवडतो ] मस्त पट्टे ओढलेला डबा वाट पहात मी प्लॅटफॉर्म वर उभा मनात दाटून येत असतो विरक्तीचा उमाळा रात्री छान झोप घेतलेली असते मनात कामाची जाग दिसत असतात ट्रॅकवर छत्र्यांचे ताटवे ट्रॅकच्या सोबत भिम्तीवरच्या झैराती बंगाली बाबा नौकरी पावो मस्त महिने मे दस हजार कमाओ दोसती करो फिरंगनसे पेट गैस और सैक्स की दवाए इंद्री का छोटापन ...
काव्यरस

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

Published on गुरुवार, 17/02/2011
मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)
किती दिवस झाले माहेराला गेले नाही
काव्यरस