वषाट
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला.
कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं.
परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.
मिसळपाव