Skip to main content

नेहमीसारखेच - १

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 04/03/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीसारखेच - १ आजही तिला छान जमलेली कविता दिली वाचायला.... अगदी नेहमीसारखेच..... आजही तिने वाचून प्रेमाने विचारले मला..... अगदी नेहमीसारखेच.... कसे जमते तुला रे..... इतके सुंदर शब्द... इतक्या छान उपमा... मनाचा ठाव घेणारी लय... अंत:करणाला थेट भिडणा-या भावना... तू आणतोस तरी कुठून रे... काय उत्तर देऊ....विचार करतोय... खर तर हे प्रश्नच निरर्थक आहेत... हो खरंच निरर्थक आहेत... मी तर... मी तर फक्त तिला कागदावर उतरवत होतो.... नेहमीसारखेच... अगदी नेहमीसारखेच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०४/०३/२०११)
लेखनविषय:

वाचने 2334
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

नेहमीसारखीच आवडली. (वाचक)बेसनलाडू

सर्वांचे धन्यु...