Skip to main content

वषाट

लेखक मुक्त यांनी शनिवार, 05/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला. कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं. परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.

तीचे डोळे

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते. ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले. ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते.

पाहून सयीला माझ्या....

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी... सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती... ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या... अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया... चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी... ......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत... पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.
काव्यरस

म्हटलं तर अनावश्यक..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण... इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो.

जमात : फिल्मी आणि बुंगारी

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदन : या ही लेखाचा हेतु सहज गम्मत-जम्मत असाच आहे. कोणाचाही अनादर करण्याचा कोणताही हेतु नाही. प्रत्येक जमातीत अपवाद असतात हे लेखकास मान्य आहे. धन्यवाद मनस्कार मित्र हो , आमच्या मागील भागावरील....आय मीन.....मागील लेखावरील वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद !! आज आपण करणार आहोत काही आणखी ज'माती' बुंगारी (या शब्दा बद्दल श्री. शंकर पाटील यांचे शतश: धन्यवाद !!) भिडणे !! हा शब्द पुणेकरांस व इतर सामान्य जनतेस ;) ठावुक असेलच, शिवाय या शब्दाचा वेग-वेगळ्या अर्थाने वापर ही करता येतो. एक म्हणजे वाद घालताना भिडणे. दुसरा म्हणजे पोरीला भिडणे.

इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या धोरणात हे चालेल ह्या समजुतीने देत आहे. जर आक्षेपार्ह वाटले तर उडवले तरी चालेल - इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे. साधारण ४-५ दिवसांचे (रोज ३-४ तास ह्या प्रमाणे) काम आहे. येत्या सोमवारी सुरु केल्यास (७ मार्च), रविवार पर्यंत (१३ मार्च) पुर्ण करणे अपेक्षित आहे. काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे.
  1. घरी computer व Internet Connection असावे
  2. बारहा वापरता आली पाहिजे - http://www.baraha.com/
  3. अनुवाद करण्याचा अनुभव असल्यास उत्तम, नसला तरी चालेल.