Skip to main content

पुणे शहरात नोकरी निमित्त राहण्याची सोय

लेखक आवशीचो घोव् यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे शहरात ३००० ते ४००० रु प्रतिमहिना राहण्याची सोय होईल असे ठिकाण कोणी मिपाकर सुचवू शकतील काय?

पुष्पक

लेखक मॅक यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. त्या ठिकाणची ही काही फुलझाडे. बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.. काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा.... ०१) ०२)

वारं येणे, भूत काढणे वगैरे वगैरे - काही प्रश्न - मिपाकरांकडून उत्तरे मिळतील ही अपेक्षा

लेखक आवशीचो घोव् यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग मी मालवणी माणूस, सुट्टीसाठी म्हणून गावी गेलो, त्यावर्षी आमच्या घरात "देवाची कामे" करणार होते. तर त्या दिवशी सकाळी "देवाच्या कामांना" सुरूवात झाली. कोंबडा कापणे, महापुरुषाला नैवेद्य दाखवणे असे प्रकार झाले. रात्री जेवण आटपून सगळी मंडळी एकत्र जमली. तेव्हा नेहमी प्रमाणे आमच्या एका काकांच्या अंगात "वारं संचारलं". सगळे जण त्यांच्या पाया पडू लागले आणि आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडू लागले. आता साक्षात देव आहे तर त्याला सगळं माहित असणार असा विचार करून मी देवाला काही न विचारता फक्त पाया पडून बाजूला झालो. थोड्यावेळाने माझी एक चुलत आत्या देवाच्या पाया पडायला आली.

स्त्री सूक्त

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या राज्यात ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही एक गोष्ट अगदी सेम असते प्रत्येक घरात एक राणी असते आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते *** फुलांसाठी अहंकारांचे भेदक बाण सुटण्यापूर्वीच खुडून टाका नाजूक, सुंदर फुलांसाठी धनुष्य फेकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ ***
काव्यरस

स्त्री

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गीत मी प्रीत मी साद मी हाक मी शब्द मी व्यक्त अखंडीत !! मी राधा मी मीरा मी शक्ती मी भक्ती मी अणु मी रेणू समाजात!! मी सल मी बळ मी खोल मी पंख मी धरा मी नभ संभ्रमात !! मी धुंद मी गंध मी नशा मी फ़ुल मी सुध मी शेज जन्मजात !! --- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

स्त्री सूक्त

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राणीचे राज्य ब्रिटीश आणि आमच्यात एक गोष्ट अगदी सेम आहे प्रत्येक घरात एक राणी आहे आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम आहे *** चिमुकल्या फुलांसाठी अहंकाराची बोचक कुसळे बाण होण्याआधी छाटून टाका नाजूक चिमुकल्या फुलांसाठी धनुष्य टाकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरूषातील कोमल स्त्री जागवा आणि प्रत्येक स्त्रीमधील पुरुषार्थ ***

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११
काव्यरस