Skip to main content

मासे २३) चिंबोरे/खेकडे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चिंबोर्‍यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्‍यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अ‍ॅलर्जीहई असते चिंबोर्‍यांची. नर व मादी चिंबोरे. मादी चिंबोर्‍यात लाख मिळते. लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच.

मसालेदार हरबरा बटाटा उसळ.

लेखक कुंदन यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. ) १ वाटी सुके खोबरे. १ मोठा कांदा. २ मिरच्या २ लसुण पाकळ्या ( सोलुन) छोटा आल्याचा तुकडा १ टि स्पुन लाल तिखट १ टि स्पुन मसाला. रात्र भर भिजत ठेवलेल्या हरबरे निथळुन घेणे. सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे. भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे. बटाटा धुवुन , सोलुन व कापुन घेणे. एका कुकर मध्ये तेल तापवत ठेवणे.

हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?

लेखक वेताळ यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे. कित्येकदा ह्यावर ज्या त्या सणावेळी चर्चा इथे मिपावर होतच असते. सण साजरे करण्यापेक्षा त्याला जे चंगळवादाचे नवे रुपडे आले आहे ते मात्र समाजासाठी घातक बनत चालले आहे.

कालच्या सामन्या नंतर रीकी ने फोडलेल्या वस्तुंची यादी.

लेखक महेश काळे यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
१. स्वतः ची फळी (बॅट) २. कोच ची आरामखुर्ची. ३. रेस्टरुम मधील दूरचीत्रवाणी संच, रीमोट सहीत. ४. स्टेडीयम मधील जेवढे सापडतील तेवढे दूरचित्रवाणी संच. ५. कॅमेरा आणि छायाचीत्रकाराचे डोके. ६. मैदानातील दीवे. ७. युवी च्या गाडीचे टायर. ८. रीलायन्स मोबाईल चे टॉवर. ९. हॉटेल मधल्या काउन्टर वरील दूरध्वनी संच. १०. टॅक्सी चे मीटर (वीमानतळावर जाताना). ११. सीग्नल वर थांबलेल्या शेजारच्या गाडीतील आकाशवाणी संच. १२. गुजरात टुरेझम चा जाहीरात फलक. १३. अजुन एक दूरचीत्रवाणी संच (हायलाईट्स पाहताना) १४. सगळ्यात शेवटी स्वतः चे डोके (असल्याचा संशय येउन)

<जराथांबा>

लेखक लंबूटांग यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्रोत साहित्य: एक मोठ्ठा पूर्णविराम, कंपूबाज, विचार, अ‍ॅटीट्युड, दोन कंस, त्यावर ठोकता येईल असे enter बटन, किस्सा परदेशगमनाचा , दुसऱ्यांच्या खरडवह्या उचकून सापडलेल्या कुरापती, मायदेशातील आठवणी. कृती: Text box मध्ये विचार उकळण्यास ठेवावे. पूर्णविरामाचे सर्वमान्य वापर विसरून जावे अथवा न विसरता अधून मधून text box मध्ये भरावेत. किती झाले आहेत ते बघून घ्यावेत. पूर्णविरामांच्या संख्येनुसार प्रतिसादाचे काठीण्य बदलते. पूर्णविरामाने भागत नसल्यास दोनास एक अथवा पावपट किंवा जास्ती enter key ठोकावी.

या अंधश्रद्धेचे काय करू?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 25/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :( तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल!