मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसालेदार हरबरा बटाटा उसळ.

कुंदन · · पाककृती
साहित्यः १ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. ) १ वाटी सुके खोबरे. १ मोठा कांदा. २ मिरच्या २ लसुण पाकळ्या ( सोलुन) छोटा आल्याचा तुकडा १ टि स्पुन लाल तिखट १ टि स्पुन मसाला. रात्र भर भिजत ठेवलेल्या हरबरे निथळुन घेणे. सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे. भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे. बटाटा धुवुन , सोलुन व कापुन घेणे. एका कुकर मध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे. मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा. त्यात हरबरे व कापलेला बटाटा टाकुन पुन्हा एकदा नीट मिक्स करा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कुकरचे झाकण नीट लावुन २-३ शिट्या मारा( काढा). कुकर उघड्यायची जास्त घाइ करु नका , ते गार झाल्यावरच उघडा. Image removed. पाहिजे त्या प्रमाणे हादडा , नुसते / चपाती बरोबर / ब्रेडबरोबर

वाचन 12173 प्रतिक्रिया 0