Skip to main content

शोध माझा

लेखक निनाव यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शोधते आहेस मला कुठे तु मनी तुझ्याच वसतो मी असलो दूर जरी असा जवळच तुझ्या असतो मी नको शोधूस इतरत्र मज बघ जरा डोळे मिटून वेडी माझी प्रिये कशी तु डोळ्यांत तुझ्या असतो मी शोधू नकोस बाहेर मज तिथे दिसेल पुतळा माझा माझ्या सारखाच, मात्र कधी तो नसतो मी जगतो तुझ्या श्वासात असा सुगंधच तुझा असतो मी कुशीत तुझ्या भासेन तुला तिथेच तर सदा असतो मी

एप्रिल फुल

लेखक बन्याबापू यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल ला असे काय घडले कि नेमकी या दिवशी आपली बुद्धि गायब होते ? जाणकारांनी 'पक्या' टाकावा...'आंद्या' चालणार न्हाय ;) -(गेंदा फुल) बन्याबापू

झन झन झन झन पायल..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
झन झन झन झन पायल.. (येथे ऐका) पं मल्लिकार्जून मन्सूर..! काय बोलू मी त्यांच्याबद्दल..? सिंहगडावरच्या देवटाक्याच्या पाण्याइतकाच स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि सात्विक माणूस. गवई म्हणून जितका मोठा, त्याहूनही अधिक एक सहृदयी माणूस..! सोबत मन्सूरअण्णांच्या नटबिहागाचा दुवा दिला आहे. दूरदर्शनवरील कुठल्याश्या कार्यक्रमातील हे ध्वनिमुद्रण आहे. मन्सूरअण्णांना नटबिहागाची फर्माईश केली गेली आहे आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी मन्सूरअण्णांनी 'झन झन झन झन पायल..' ही बंदिश सुरू केली आहे.

झोपेत चालणे..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काहि लोकांना झोपेत चालण्याची सवय असते असे वाचनात आले.. काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक वागण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत चालतात किंवा इतर हालचाली त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात.. नायक वा नायिका झोपेत चालते या वर चित्रपटात हि बरेच प्रसंग आपण पाहिले असतिल.. स्लिप वॉकर नावाचा एक सिनेमा पण येवुन गेला होता..रात और दिन सिनेमात नरगीस वर असे सिन चित्रीत केले गेले होते. काहि लोक झोपेत चालत जावुन दाराच्या कड्या उघडतात अश्या पण गोष्टी ऐकिवात आहेत... आपल्या वाचनात वा पहाण्यात असे काहि आले का? अनुभव शेअर करणार का?

गझल

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा काल स्वप्नात आली गझल खुले पापणी अन् उडाली गझल कशी कोरडी मी, जरी वाहते तुझ्या आठवांच्या पखाली गझल? नसे वेगळे रूप माझे-तिचे, मला वारशाने मिळाली गझल "जरा एकटे वाटते, शब्द दे तुझे सोबतीला" म्हणाली गझल जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये, क्षणार्धात माझीच झाली गझल! नको या प्रवासात थांबा कुठे, सवे आज माझ्या निघाली गझल
काव्यरस

जाहिरातीच्या --चा घोव....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरातीच्या --चा घोव....
रंगलेल्या सामन्यात जाहिरातींचे मांजर आडवे ... कधी शाहरुख ओठांचा चंबू करून मैत्रिणीची वाट पाहतोय... तर ३ अंडामन टीटी खेळताना उच्छाद मांडतायत.....चित्र नेहमीचेच आहे... पण काल ते प्रकर्षाने खटकले शिवाय आपण जिंकलेल्या मॅचचे महत्व वेगळेच....

भिऊ नकोस ...

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 31/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे "भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे." नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे "भिऊ नकोस ...
काव्यरस

बेदखल

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 30/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
धुराच्या ढगात वेढलेला, आणि चारी बाजूनी घोंगावणा-या चारचाकी यंत्राच्या गोंगाटात, डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत तल्लीन झालेला तो रंगारी… त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय, हे ओळखण तसं कठीणच. जपणा-या माणसांपेक्षा मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या यंत्रांची जंत्री वाढली कि हे अस व्हायचंच…