Skip to main content

रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करत आहेत का ?

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 18/04/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
अखिल भारतीय आखाडा परिषदेने योग गुरु रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करीत असून पारंपरिक औषधे अधिक किमतीत विकत असल्याची टीका केली आहे.रामदेव बाबा स्वदेशीच्या मुद्‌द्‌यावरही दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप परिषदेचे प्रवक्ते बाबा हठयोगी यांनी केला आहे. आपल्याला या विषयी काय वाटते ?

काय वाटल असेल माझ्या जीवाला...........

लेखक शिल्पा कांबळे यांनी सोमवार, 18/04/2011 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
चाललो होतो एकटाच एका वाटेवरुन तु भेटलीस आणि सुरुवात झाली नव्या आयुष्याला आनंद वाटु लागला माझ्या जीवाला पुन्हा रोज येऊ लागलो कॉलेजला एक दिवस धाडस करुन विचारल मी तुला तु नाही म्हंटल नाही, पण टाईमच नाही उरला अभ्यासाला श
काव्यरस

कोल्हापुर वारी...

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 18/04/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकतीच पार पडलेली ज्योतिबाची यात्रा आणि महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना मिळालेला प्रवेश..... या निमित्ताने काही फोटूरूपी आठवणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ३१ डिसेंबर ...... नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबई नगरी पार्ट्या झोडण्यात आणि नविन वर्षाचे संकल्प करण्यात (की मोडण्यात) दंग होती आणि त्याच वेळेला कोणतीही पूर्वनियोजित तयारी नसताना कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही मुंबापुरीचा निरोप घेतला.

पुढचं पाऊल (१९५०) – पण नंतर काय?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 18/04/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
नंदा खरे यांचा मानसपुत्र 'अंताजी'विषयीच्या या धाग्यावर नुकतीच झालेली चर्चा ताजी असतानाच योगायोगानं १९५० सालचा ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट अंशत: पाहण्यात आला आणि पुन्हा एकदा त्या चर्चेची आठवण झाली. चित्रपटाचं ढोबळ कथासूत्र इथे वाचता येईल. त्यात मांडलेला विचार आणि तो मांडण्याची पद्धत रोचक वाटते. प्रमुख पात्र असणारा गावातला किसना महार सालस, गुणी, कष्टाळू पण भडक माथ्याचा असतो.

प्रगतीच्या दाराआड

लेखक रमताराम यांनी सोमवार, 18/04/2011 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज NDTV वर हादरवून टाकणारा हा रिपोर्ट पाहिला. दिल्लीच्या इंडिया गेट पासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीच्या - खरे तर शहराच्या - दारूण अवस्थेकडे पाहून हादरून गेलो. तब्बल १० लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची अवस्था काय आहे हे स्वतःच पहा.

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 18/04/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।

कळत नाही...

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 18/04/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि... आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण... अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....