मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कळत नाही...

अज्ञात · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि... आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण... अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....

वाचने 5344 वाचनखूण प्रतिक्रिया 36

मृत्युन्जय 18/04/2011 - 11:15
त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे की त्याने आपल्याला न सांगताच दुसरी चाल पकडल्यामुळे ... ह्म्म्म्म्म्म. अजुन थोडे नीटसे मांडता आले असते. असो आपल्या दुखात सहभागी नाही होउ शकत. पण भापो.

स्पा 18/04/2011 - 11:41
त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,.... ह्म्म्म्म्म................
होईल सर्व ठीक.. अशा गोष्टी झाल्या की ते डोळ्यातलं पाणी तर नक्कीच लवकर ओसरून जातं आणि पूर्वीपेक्षा जगायला अधिक लायक बनून आपण नवीन कोणाची वाट पाहतो..

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 18/04/2011 - 12:55
अनेक अनुभवांती.. :)

टारझन 18/04/2011 - 12:27
मला खुप रडु येत आहे .. प्लिज टॉवेल द्या डोळे पुसायला .. :( हे सगळं आयुष्याच्या वळणावरंच का होतं ? सरळ रस्त्याला कधी होत नाही !! :) असो , आमचं एक दुकान आहे चपलांच , आयुष्याच्या वळणावरंच .. चांगल्या चपला मिळतात .

In reply to by टारझन

नरेशकुमार 18/04/2011 - 13:06
(ह्याच पोस्ट वरील) माझा प्रतिसाद वेळ काढुन वाच. तन आनी मन दोन्ही शांत(थंडगार) होईल. . . बादवे कोनत्या चपला मिळतात दुकानात ? फ्लोटर्स आहेत काय ? काय.. उन्हाळा चालू झालाय, स्वस्तात देनार असशिल तर येइल बुवा तुझ्या वळनारील दुकानात.

योगी९०० 18/04/2011 - 14:30
त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,.... आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले असेल किंवा तुमचा पाय घसरला असेल...मग तो कशाला तुमच्या साठी थांबेल?

In reply to by योगी९००

परिकथेतील राजकुमार 18/04/2011 - 14:37
आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले असेल किंवा तुमचा पाय घसरला असेल...मग तो कशाला तुमच्या साठी थांबेल?
किंवा सदर लेखक हे वाममार्गाला लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by पक्का इडियट

परिकथेतील राजकुमार 18/04/2011 - 14:48
वाममार्गाला कसे लागता येते यावर आपण एक लेखमाला लिहावी
तुमचे चरित्र लिहून हवे आहे असे सरळ सांगा की ;)

In reply to by पक्का इडियट

परिकथेतील राजकुमार 18/04/2011 - 14:59
तुला माझा महामहोपाध्याय करायचा विचार आहे असे सांग की
=)) =)) आपली काय हरकत नाही पण अंगवस्त्र मिळणार नाही. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ 18/04/2011 - 15:01
डाव्या कम्युनिश्टाना " वाममार्गी" म्हनावे का? बाय द वे " कम्युनिश्टाना डावे का म्हटले जाते"

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 14:46
इस दिल के तुकडे हुये हजार.. कोई इधर गिरा तो कोई उधर गिरा... ज्यांचे ज्यांचे "डोळे पाणावले", "हृदय पिल्वटल" तेच लोक माझ दुख्ख समजू शकतात... त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो...

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

>> त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो... चला त्या निमित्ताने का होईना .. आतड्यांची सफाई झाली असेल अशी आशाउशा करुया ;) -झिप्र्या

मराठमोळा 18/04/2011 - 14:52
ज्यांचे ज्यांचे "डोळे पाणावले", "हृदय पिल्वटल" तेच लोक माझ दुख्ख समजू शकतात... त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो...
परा, टारु वगैरे लोकांना तुमचे दु:ख समजले आहे असे गृहीत धरतो. :) शुभेच्छा!!!!

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 15:22
वडापाव भावू.... तुमच्या आणि बाकीच्या लोकांच्या वैचारिक उहापोहापुढे, एरंडेल सुद्धा फिक्क पडेल अस वाटतंय.. आतडी साफ होण्याचा काय घेऊन बसलात... आता तर आत्मशुध्दी व्हायला लागलीय... असो... ...टकल्या...

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

वपाडाव 18/04/2011 - 18:04
ड्वल्यात अंजन अन कानात तेल घाला रे याच्या.... (सध्यातरी कानातच) मी अजुन उपस्थिती नाही लावली अन तु मेल्या माझ्यावर नाव काला टाकुन र्‍हाईला ???? एरंडेल तर बाजुला राकेलंच पाजवावं म्हंतोय .... तुझ्या आत्म्याला सांभाळुन ठेव... नाहीतर शांतीसुद्धा लाभणार नाय.... -राकेल्या

In reply to by वपाडाव

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 20:11
वडापाव भाउ.. सपशेल आपली मिष्टेक, वडापाव बरोबर खाल्लेल्या मिरच्यांना जागून सांगतो, कि मनापासून स्वारी, अहो टारझन भौच्या ऐवजी तुमचा नाव घेतल गेल... काय करणार डोळ्यात पाणी एवढ होत कि नीट दिसलच नाय बघा... लहान्या भावाला एक डाव माफ करून टाका चला... जय बजरंग...

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 16:19
>>डाव्या कम्युनिश्टाना " वाममार्गी" म्हनावे का? बाय द वे " कम्युनिश्टाना डावे का म्हटले जाते">> जर गणिती दृष्ट्या पहिला तर वजा X वजा हे अधिक होत... त्या मुले डाव्या कामुनिश्तांना वाममार्गी म्हणता येणार नाही... असो...

आत्मशून्य 18/04/2011 - 16:23
आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो
तूम्ही तो माणूस हा मानूस आहे की बाइ मानूस हे स्पश्ट केल्यास प्रतीक्रीया देता येइल.

In reply to by आत्मशून्य

नरेशकुमार 18/04/2011 - 17:40
लेखक आयडी स्त्रि असेल तर ती व्यक्ती पुरुश मानुस असेल. लेखक आयडी पुरुश असेल तर ती व्यक्ती बाईमानुस असेल. असो, मी सध्या तरी इथ्पतच विचार करु शकतो. दोस्ताना बिस्ताना असलं काय दळभद्रि सुद्धा असु शकेल.

In reply to by नरेशकुमार

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 17:56
नरेस भाउ, आग्दी बरोबर ओळखलत... आणि हो...दोस्ताना फिस्ताना अस्ल काही नाहि बरं का ....

अन्या दातार 18/04/2011 - 17:41
एरंडेल घ्यायला अता काही हरकत नसावी तुमची असे दिस्तेय एकंदरीत. जेंव्हा एरंडेल घ्यायची गरज वाटेल तेंव्हा फक्त हा लेख(?) आणि प्रतिक्रिया वाचा ;)

In reply to by अन्या दातार

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 18/04/2011 - 17:58
अन्या भो... बरोबर... आताच परत हे सगळ वाचलं आणी पोटात गुडगुड सुरू झाली बघा... जालीम उपाय दिसतोय राव...