Skip to main content

निरुत्तर

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 22/04/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल खच्चुन भरला होता. विद्यार्थी -पालक सभा. नविन सिलॅबस. दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण. दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक. त्यात तो भेटायला येणार होता. शाळेतल्या गुणवंत मुलामधला. मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती. टाळणे शक्य नव्हते. ----------------------------------------------------------------------------------------- सभा सुरु झाली. चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले. मी थांबलो. सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले. कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली. मुले फिदीफिदी हसली. -------------------------------------------------------------------------------

'तार्‍यांचे बेट' - प्रसन्न करणारा अनुभव

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 22/04/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या व्यापात बर्‍याच गोष्टी करायचे राहून जाते. सकाळी निवांत बसून वर्तमानपत्र वाचणे असो किंवा सहजच मारलेला एखादा फेरफटका असो; मोठ्या आनंदाच्या मागे दमछाक करणारी दौड करतांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विनासायास मिळणार्‍या आनंदाचा आपण नेहमीच बळी देत असतो. नंतर 'माझ्याच वाट्याला का अशी पळापळ' असे गळा काढून ओरडण्यात ही आपण मागे हटत नाही.

पाखरा जा..

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 22/04/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
'पाखरा जा त्यजुनिया..' हे भाईकाकांनी गायलेले गाणे म्प३ स्वरुपात कुणाकडे आहे काय? असल्यास ते कृपया मला tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकाल काय? त्याचप्रमाणे आंतरजालावर हे गाणे कुठे मिळू शकेल याबद्दलही माहिती हवी होती.. या गाण्याचे संगीतकारही माझ्या मते भाईकाकाच आहेत. कवी कोण आहेत हे कळू शकेल काय? धन्यवाद, तात्या.

प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/04/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे? कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कस

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

बेक्ड पोटॅटो वेजेस

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 21/04/2011 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आहो: म्हणजे 'बटाट्याच्या भाजलेल्या काचऱ्या'. मी: काय हे? अगदी कचरा केलास रे वेजेस चा! पोटॅटो वेजेस म्हंटल की कसा मस्त भारदस्त स्टायलिश आयटम वाटतो! पण खरं ते इथे मान्य करायला हरकत नाही (आमचे आहो अजून मिपा वर नाहीयेत तोवर हि सुट घेता येतीये हो!) - पोटॅटो वेजेस म्हणजे भाजलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्यांनी जरी त्याचं देसी नामकरण केलं असलं तरी पदार्थ असतो लई फक्कड! आणि करायला कित्ती कित्ती सोपा! फक्त बटाटे, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल- एवढाच जिन्नस सुद्धा पुरतो.

स्टफ चमचम- बंगाली मिठाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 21/04/2011 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ किलो घरगुती पनीर (बाजारातून आयते आणलेले ही चालेल) १ कप साखर ३ कप पाणी १ टीस्पून रोझ इसेन्स २-३ थेंब गुलाबी खायचा रंग १ टीस्पून वेलचीपूड २ टेस्पून पिठीसाखर पाकृ: पनीर चांगले मऊ मळून घ्यावे व त्याचे दोन सारखे भाग करावेत. एका भागात खायचा गुलाबी रंग घालून मळावे व त्याचे लंबगोल बनवावे (ओव्हल शेप). . जाड बुडाच्या भाड्यांत साखर+पाणी +रोझ इसेन्स घालून उकळी आणावी. उकळी आली की त्य

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

नवा खेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 21/04/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)
काव्यरस