Skip to main content

नंदीकाळा-मुळ काव्य>(जग हे बंन्दीशाळा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 14/05/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन काव्य मायमाऊली मराठीच्या अतीस्वाभिमानी किंवा अंधाभिमानी अपत्यास हे काव्य अर्पण करताना मनाला "दिव्य आनंद" होत आहे.हे सांगणे अगत्याचे वाटते.आयुष्यभर केळ्यांचा आस्वाद न घेता,व्याकरणाचे 'शिक्रण' करुन खाण्यातच यांचा जन्म जायचा...आणी तिथेही 'यांचा' पंक्तीप्रपंच मधे मधे आड यायचा.तेंव्हा या माहाभागांच्यामधुन आपण बाहेर पडावे,आणि जाता जाता एक आहेर,बाहेर पडण्यापुर्वी यांना करावा हे उचित नाही काय? असो...विडंबनाला जुळी भावंडे म्हणता म्हणता,मुळ काव्य-जग हे बंन्दी शाळा-प्रथम अपत्य,बघ हा रंगित चाळा-द्वितीय(किंवा एकमेवाद्वितीय)
काव्यरस

बंगाल

लेखक chipatakhdumdum यांनी शनिवार, 14/05/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
बंगाल निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. ममतादीदींचा इतिहास पाहीला, तर प्रशासनावर पकड ठेवण्याबद्द्ल त्या कधीच प्रसिध्द नाहीत. रेल्वे खात्याचा काय कारभार कसा चालला आहे, हे जगाला चांगलच माहीत आहे. विषेशतः ज्यांची कारकीर्द विरोधी बाकांवर बसण्यात जाते, ते दीर्घ काल, नव्हे, पूर्ण टर्म सुद्धा नीट शासन करू शकत नाहीत, अस भारतातल्या अनेक उदाहरणांवरून आजपर्यंत दिसून आलेल आहेत. आठवा, युतीचे महाराष्ट्रातील शासन. चांगला गोलंदाज कप्तान झाला, म्हणून तो लगेच चांगला फलंदाज होइल अस नव्हे. म्हस पाण्याबाहेर आली की नंतरच कळत की दुधाला कशी आहे. बंगाली लोकांना शुभेच्छा.

अनोळखी...(गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 14/05/2011 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
देऊ नको मला तू नावे अनोळखी का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी? मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे मागून सावली का धावे अनोळखी? गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी वैशाख तापलेला वणवा उरी जळे ओठात गीत ओले यावे अनोळखी - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com

मैफील आज जमली -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/05/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
मैफील आज जमली , पण रंग नाहि भरला नादात मी तिच्या-तो कोठेतरी विसरला ! मी देवळात दमलो देवीस शोधताना माता घरात दिसली दारात जीव हसला ! शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो - शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला ! पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा ; गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला ! पाठीत वार केला तो मित्र मीच जपला वैरी समोरुनी का जाता उगाच हसला ?

क्रोमियम प्लेटेड ढग

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 13/05/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
कविता सुचली ही बातमी वाचून. क्रोमियम प्लेटेड ढग उंदराला सोडून धरतीवर, गेला नभात संगणेशक पीसीची कटकट कशाला, मेघातून गर्जणार निर्देषक दर तीन वर्षांनी व्हायचा घरचा संगणेशक म्हातारा लडखडती चाल बघून सगळ्यांचा चढायचा पारा मुन्नी नाचतांना हटकून संगणेशक व्हायचा जॅम आतातरी नविन आणा, आम्ही व्हायचो बदनाम अचानक येऊन कोठूनसे उंडारायचे व्हायरस त्यांचा ताप उतरवतांना अंगारात बुडायचा शांतरस मेंदू आपलाच वापरायचा सोडा संगणकी प्रघात रहाणार बृहस्पति आता क्रोमच्या रंगीत मेघात किचकट कामे सारी मेघात भले खालचा मजल

मेनू कार्ड

लेखक पल्लवी यांनी गुरुवार, 12/05/2011 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कुणासोबततरी कुठल्याश्या हॉटेलात जाणं होतं. पाणी वगैरे पिऊन जरा स्थिरस्थावर झाल्यावर मेनू कार्ड हातात येतं. गप्पा मारता मारता मंडळी काय खावं-प्यावं ठरवत असतात. तेव्हा मी मात्र पूर्ण हरवून गेलेली असते – तुझ्या आवडीचा पदार्थ त्या मेनू कार्डवर शोधण्यात – सहज चाळा म्हणून. मला काय हवंय ह्यापेक्षा, तुझ्या आवडीच्या पदार्थाचं नाव डोळ्यांसमोर यावं म्हणून क्षणात बरीच धडपड होते. लेदरचं मोठं जाडजूड मेनू कार्ड फटाफट चाळला जातो – अधाशीपणे . फक्त त्या एका पदार्थाचा उल्लेख नजरेसमोर यावा म्हणून.

बदाम बर्फी / कतली

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 12/05/2011 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी बदाम ३/४ ते १ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्तं करणे) २ टेस्पून तुप १ टीस्पून वेलची पुड १/४ वाटी दुध (लागेल तसे घालावे) चांदीचा वर्ख (ऐच्छिक) . पाकृ: १ वाटी बदाम १ तास गरम पाण्यात भिजवून, सालं काढून घेणे.

त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/05/2011 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याच्या सुट्टीत सुध्दा ते त्याला लवकर उठवतात भराभरा आवरुन सात वाजता नेहरुस्टेडियम गाठतात रिक्षाने घरी परत येण्यासाठी त्याच्या खिशात २० रुपये कोंबतात घरी त्याच्या साठी बोर्नेव्हीटा तयार ठेउन घाईघाईने ऑफीसला जातात या सगळ्या मेहनतीच फळ अजुन त्यांना मिळायचय होय, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय आई बाबा सांगतात म्हणुन, तो रविवारी सुध्दा सकाळी प्रॅक्टीसला जातो, दिवाळीच्या सुट्टीतही फटाक्यां ऐवजी चेंडुच फोडतो, ई.एस्.पी.एन., स्टार क्रिकेट नियमाने पाहतो, आपण हे सगळे का करतोय हेही त्याला अजुन कळायचय, पण, त्यांना मात्र त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय बर, हा सचिन फक्त क्रिके

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/05/2011 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध १ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली! मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता!

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/05/2011 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य माझे काळीज मोडून खडकावरल्या फेसाळ लाटा पाय धुवूनी जात होत्या त्याही मागे सरल्या आता आली ओहोटी म्हणून शुभ्र पांढरी मऊ रेती पायाखाली येत होती ढिगारा त्या रेतीचा आताच गेला कोसळून कोण, कोणाचा,कुठला, मी, तो? कशास धरूनी चालत होतो? समोर आता तांबड काळसर आकाश नुरले सारे व्यापून - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०४/२०११