Skip to main content

मैफील आज जमली -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मैफील आज जमली , पण रंग नाहि भरला नादात मी तिच्या-तो कोठेतरी विसरला ! मी देवळात दमलो देवीस शोधताना माता घरात दिसली दारात जीव हसला ! शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो - शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला ! पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा ; गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला ! पाठीत वार केला तो मित्र मीच जपला वैरी समोरुनी का जाता उगाच हसला ?
लेखनविषय:

वाचने 1072
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

जमले आहे.... आवडली कविता....... :)