Skip to main content

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/05/2011 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य माझे काळीज मोडून खडकावरल्या फेसाळ लाटा पाय धुवूनी जात होत्या त्याही मागे सरल्या आता आली ओहोटी म्हणून शुभ्र पांढरी मऊ रेती पायाखाली येत होती ढिगारा त्या रेतीचा आताच गेला कोसळून कोण, कोणाचा,कुठला, मी, तो? कशास धरूनी चालत होतो? समोर आता तांबड काळसर आकाश नुरले सारे व्यापून - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०४/२०११
लेखनविषय:

वाचने 1300
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पा भे, शुभ्र पांढरी मऊ रेती पायाखाली येत होती ढिगारा त्या रेतीचा आताच गेला कोसळून -- साष्टांग!