ट्रॅफिक जॅम मध्ये फसले असल्या सारखे आपल्याला वाटते का कधी.
पुढे सरकत रहा
पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.
ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे.
मिसळपाव