Skip to main content

ट्रॅफिक जॅम मध्ये फसले असल्या सारखे आपल्याला वाटते का कधी.

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 07/06/2011 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे सरकत रहा पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते. ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे.

थोडा टीपी

लेखक मीमाको यांनी मंगळवार, 07/06/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.

फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे

काँग्रेसची आरती-अर्थात काँग्रेसचा बेंडबाजा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 07/06/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ काँग्रेसची आरती़॥ मुळ रचना-आरती ज्ञानराजा॥ आरती काँग्रेसराजा,तुझा वाजला बेंडबाजा। दुष्टावा नी दंभाचा,कीती झाला गाजावाजा॥ध्रु॥ गाड-गीळांचा अंनंत,आणी दिग्विजयांचा सींगं। चॅ नल वरी गुरंगूरं,त्यांचं फुटलं आता बींग॥१॥ अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ। वाट लागली काँग्रेसची,त्यांची पुरती उडली झोप॥२॥ बाबांमागे पोलीसं,किती बेरकी कारस्थान। अत्याचारी काँग्रेसनी,कापली लोकशाहीची मानं॥३॥ म्हणती खाल्या शेतकय्रांच्या,रामदेवबाबांनी जमीनी। त्यावर हरीद्वारचा मठं,कीती कपट यांच्या मनी॥४॥ करती उपदेश बाबांना,म्हणती शिकवा योगाभ्यासं। राज

एक आठवण, धुळीतली...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/06/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली. पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं.

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/06/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे, २) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो. ३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे. तरीही असे लिहावेसे वाटते की, पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही.

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले.

टू जी

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 06/06/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज-काल मला तुझी 'करुणा' वाटायला लागली आहे... टूजीचा अमंगळ गजर आता पाठलाग करायला लागला आहे... उगाच वोट्स मागायला, कितींदा रे येतोस? डीबीच्या रीआलिटी शो मध्ये बलवा मात्र 'शहीद' होऊन जातो बोलयचं असतं मला, बरच काही नजर सांगून जाते, मिडीयासमोर येताच, का मग माझी कणी मोळी होऊन जाते? 'दया' उरली नाही उरली 'करुणा'ही नाही एअर सेलच्या हवाबंद डब्यात पुरेसा 'निधी' जमला नाही बंधू- भगीनी नकोत मला, भ्रष्टाचारात रमतो मी... म्हणूनच देशप्रेमाच्या भावना स्वस्तातच विकल्यात मी! घोटाळ्यात गुंतून जाण्याचा माझा स्वभाव नाही.. अडकलोच जरी मी सुटण्यास प्रतीबंध नाही
काव्यरस

'६ जून'.... भारतीय प्रमाणवेळ सायं. ५:२१ ३८८ वा राज्याभिषेक दिन.

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 06/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज खर्‍या खुर्‍या जाणत्या राजाचा 'राज्याभिषेक दिन' .......................... .......................... .......................... मनात आहे ना? बस्स झालं. काय मंडळी? नाहीतरी नुसता जयजयकार करुन काय उपयोग म्हणा?