Skip to main content

माझी पहिली कादंबरी ................

लेखक ईश आपटे यांनी रविवार, 12/06/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक आणि मिसळपावकर मित्र हो ................. माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ" ही नुकतीच प्रकाशित झाली(मनोरमा प्रकाशन). सत्य आणि आभास ह्यांच्या सीमारेषा जेव्हा पुसट होतात, तेव्हा जाणीव आपल्याला नक्की काय दाखवतेय हेच कळेनासे होते. बौध्द वैज्ञानवाद्यांच्या मते, इंद्रियांना येणारे अनुभव व ज्या वस्तुंचे अनुभव येतात त्यांमध्ये भिन्नता नसते. आकाशात दिसणारा चंद्र व मी चंद्र पाहिला हे मनाला होणारे ज्ञान, एकच आहे. वेदान्तातला दृष्टि-सृष्टिवाद ही असाच काहीसा आहे.

हायकू १

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/06/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
हायकू १
एक फुलपाखरू दगडावर बसलं मनात म्हणालं कसं फसवलं मातीमधली ढेकळं काळी पिवून पावसाचं पानी व्हत्यात मातीवानी कुकुचकु कुकुचकु कोंबडा ओरडतोय कुकुचकु तेच आहे का त्याचे हायकू? दरीच्याच काठावर घसा खरडून ओरडतोय माझाच आवाज परत येतोय सांजचा सुर्य क्षितीजावर बुडला किनार्‍यावर दगड रडला हिरवे रान हिरवेगार पाउस नव्हता तर पिवळेशार पिवळेशार समाधी लागावी म्हणून डोंगरावरचे देवूळ अंधारात जाते बुडून पाखरांचा थवा पोटासाठी सकाळी घरट्यातून उडतो सायंकाळी परत येतो - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०६/२०११

DSLR कॅमेरा वाले नवीन फोटोग्राफर

लेखक अज्ञात यांनी रविवार, 12/06/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसंग : मध्यंतरी एका शनिवार रविवारी एका प्रसिद्ध सी -वर्ल्ड आणि पार्क मध्ये फिरायला गेलो होतो. तिथे बरेच कार्यक्रम होतो आणि खरोखरच ते बेस्ट होते . डॉल्फिन , व्हेल , सी-लायन याचे एक से एक कार्यक्रम होते. तिथे बरेच प्रवासी बघितले आणि बराच लोकांकडे एकदम हाय एंड कॅमेरे होते . आणि बरेच जन कार्यक्रम बघायचा आनंद न घेता कुठे सगळा कार्यक्रम रेकॉर्ड कर किव्वा पूर्ण आर्धा तास फोटो काढत बस या मधेच वेळ घालवताना दिसले .

आल्या पावसाच्या सरी -

लेखक विदेश यांनी शनिवार, 11/06/2011 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
आल्या पावसाच्या सरी - भिजू एकवार तरी ; ओल्या माती गंधासंग ... आणू प्रेमाला ग रंग ! नको साक्षी आणाभाका , पुरावा कशाला तो फुका - साक्ष ओल्या अंगांगांची पावसाच्या या सरींची ! प्रेम माझे तुझ्यावर तुझे किती माझ्यावर - सरींत मोजणी कशाला जीव कधीचा हरवला !

पूणे (हडपसर) येथे तात्पुरती राहण्यासाठी जागा शोधत आहे

लेखक किशोरअहिरे यांनी शनिवार, 11/06/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो.. हडपसर येथे २-३ महिन्यांसाठी फ्लॅट शोधत आहे.. किंवा कुणाकडे रुममधे व्हॅकन्सी असेल तर अ‍ॅडजस्ट पण होऊ शकतो .. ११ जुलै पासुन पुण्यात असेल.. जर कोणी मदत करु ईछीत असेल तर व्यक्तीगत निरोप मधुन कळवावे.. किंवा प्रतिसाद दिला तरी चालेल...

साखर आणि फॅट चे खरे गुपित

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 11/06/2011 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
'आहो, मधुमेह झालाय न? सगळी साखर बंद करा!' ' मी सध्या काही गोड किंवा तळलेले पदार्थ खात नाही- वजन कमी करायला हो!' 'उत्कृष्ट आरोग्याची गुरुकिल्ली- कुठलाही स्वरूपात साखर टाळणे'. हे आणि असे अजून बरेच समज/गैरसमज- साखर, तूप, तेल, वनस्पती, फॅट - विषयी आपण वाचून किंवा ऐकून असतो. आपल्याला जमेल तेवढं आपण आरोग्य जपण्याचा आणि आहारात फेरफरक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीला बळी जातो. उ.दा. शुगर फ्री चॉक्लेट.

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 11/06/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे. त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे.

'गोल्डमॅन' आ. रमेश वांजळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

लेखक यकु यांनी शनिवार, 11/06/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासल्याचे आमदार आणि 'गोल्डमॅन' म्हणून राज्यभरात सुपरिचित असलेले रमेश वांजळे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी हर्षदा, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. गेल्या तीन दिवसांपासून वांजळे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कमला नेहरू उद्यान परिसरातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांची 'एमआरआय' चाचणी करण्यात आली. ही चाचणी करण्यापूर्वी वांजळे यांना अस्वस्थ वाटत होते.