बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता.
तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या..
तिच्या स्वता: बद्दलच्या संवेदना आता संपल्यातच जमा होत्या.