मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनंत

जागु · · कलादालन
सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्‍यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे. हे फुल ठेवले टेबलवर की दिवसभर सुगंध दरवळतो. १)संध्याकाळी एक एक पाकळी उमलतेय. Image removed. २) अर्धवट फुललेल फुल Image removed. ३) Image removed. ४) आमचा पण फोटो काढा. Image removed. ५) फुलत आलेल फुल Image removed. ६) पुर्ण फुललेल फुल Image removed. ७) हे आमच झाड. Image removed. ८) Image removed.
लेखनविषय:

वाचन 12408 प्रतिक्रिया 11