Skip to main content

कुणाला कुणाचे कशाला हवे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 12/07/2011 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे

पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/07/2011 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची. सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.

माफ

लेखक निखिलचं शाईपेन यांनी सोमवार, 11/07/2011 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
माफ मी माफ करायचं ठरवलंय ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो ... धावतो आणि त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना. मी माफ करायचं ठरवलयं केसांनी गळा कापनाऱ्यांना पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना आणि शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना... ज्यांनी त्रास दिला त्यांनाही ..
काव्यरस

भंगलेल्या मनाचा अभंग ३

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 11/07/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
कसे त्यागू देवा "मी" पण माझे वाटे जरी ओझे टाकवेना आत्म अभिमान आणि स्वाभिमान सांगेल का कोण भेदाभेद एकतत्त्वनाम झाले बदनाम धर्माधर्म स्तोम भोवताली "मी" पणाचा शोध घेतो आहे "मी"च आता बाबा तूच धाव देवा राहिले रे आता कितीसे रे दिन चरणी मी लीन दीनानाथा प्रार्थणारा मीच ऐकणारा मीच जन्मोन्मी हाच नाच देवा एकतत्त्व नाम धरितो मी दृढ बालक सुदृढ अहंकारी
काव्यरस

गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 11/07/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!
गोप्या घाटाच्या माथ्यावर
यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या मोठ्या ट्रेकची आखणी झाली. नेहमीचेच लोकप्रसिध्द किल्ले फाट्यावर मारून सह्याद्रीतल्या थोड्या अनगड वाटांवर उंडारायचं अशी खुणगाठ मनाशी आधीच बांधली होती.

‘हल्ली मी नवीन प्रयोग सुरु केलाय…’

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 11/07/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
काय? तुम्ही कधी कोणाचे नवीन डाएट प्रयोग नाही ऐकलेत? तुमच्या ओळखीत कोणीच जाड, अति सडपातळ, मधुमेही किंवा हेल्थ कॉन्शियस नाहीत का? मला तर हमखास सगळे त्यांच्या नवीन आहार प्रयोगांबद्दल सांगतात आणि प्रत्येकाला त्यांचा प्रयोग किती वैज्ञानिक आहे हे मला पटवून द्यायचं असतं. हा माझ्या व्यवसाया मुळे उत्पन्न झालेला धोका पण असू शकतो. असो.

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान कपडे काढून दावी डोले शोले कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥ एक एक बाई नवी , फॅन गाई गीत एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥ कधी अ‍ॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥ चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥ हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥
काव्यरस

गर्द काळोख

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्‍याचदा असं वाटतं ही रात्र कधीच संपू नये रात्रीच्या या गर्द काळोखाने लपेटून घ्यावं माझं मन हा सूर्य कधी उगवूच नये नाहितर पुन्हा हा सूर्य त्याच्या लख्ख प्रकाशात विचारेल मल माझ्या कर्माचे जाब पण कसं सांगू त्याला माझ्यावर किती आहे वरिष्ठांचा दाब? सूर्याचं जाऊदया तो आरसाही असंच करतो स्वतःला पहायला गेलो तर नोटांनी लगडलेलं निर्जीव झाड दाखवतो काही नोटा ७/१२ च्या उतार्‍याच्या काही NA करून देण्याच्या काही वृद्ध हतबल मातांच्या शिव्याशापाच्या पण माझ्या घामाची अशी एकही नाही कशी असेल?

ध्यान गरज आणि फायदे

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो?