लेखकविसोबा खेचरयांनी मंगळवार, 12/07/2011 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक जिवाभावाची मैत्रिण सोनाली भट. म्हणजे पूर्वाश्रमीची सोनाली भट, आताची डॉ सोनाली मुखर्जी. मेडिकलला असताना सधन मुखर्जी नावाच्या एका सज्जन मासेखाऊ बंगाल्याच्या पिरेमात पडली आणि त्याच्याशी लगीन केलं..
गेल्या काही वर्षांपासून सधन-सोनाली सिंगापुरला स्थायिक झाले आहेत. मिताली ही त्यांची मुलगी. तात्यामामाचा हा छोटेखानी लेख हा खास तिचं कौतुक करण्याकरता...!
वयाच्या अक्षरश: अडीचव्या वर्षापासूनच मितालीचे पाय थिरकू लागले. एक नैसगिक देवदत्त लय होती त्या पदन्यासात. सधन-सोनाली तेव्हा मुंबैतच राहायचे. त्यामुळे लगेचंच त्यांनी मितालीमधल्या या गुणांना पूर्ण वाव द्यायचं ठरवलं.
लेखकशरदयांनी मंगळवार, 12/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतली पहिली गझल
डॉ. बिरुटेसरांनी सांगितले म्हणून मध्वमुनिश्वर व अमृतराय यांची एकदमच ओळख करून देण्याचा विचार होता. पण त्या आधी अमृतराय यांचा एक विशेष नमुद करावासा वाटतो. हा मराठीतला पहिला गझलकार. इतके दिवस हा मान मोरोपंत पंडितांना दिला जात होता. त्यांची " रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी " ही पहिली गझल मानली जात होती. त्यावरून छंद-- रसना जाती असे नावही पडले. पण अमृतराय (१६५८-१७५३) हा मोरोपंतांना (१७२९-१७९४) ज्येष्ठ असल्याने त्याची " जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावे " हीच मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणावयास पाहिजे.
मला स्वत:ला या छंद, जातीत काही फारसा रस नाही.
लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी मंगळवार, 12/07/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
जही घट प्रीती न प्रेमरस , पुनि रसना नहि राम
ते नर इस संसार मे, उपजि भये बेकाम ||
" नेहमी शोधत राहायचे की आपल्या हॄदयामध्ये प्रेमरस ओत्तप्रोत भरलेला आहे की नाही आणि समजा भरलेला नसेल, आणि लक्षात आले की आतमध्ये वाळवंट आहे, तेथे पाउस पडणार नाही. तेव्हा त्वरा करा, अहंकार बाजूला करण्याची..!! तेच ध्यान आहे , हीच प्रार्थना आहे! अहंकाराला बाजूला सारण्याची कला म्हणजे योग , तोच खरा धर्म...!! अहंकार आणि विचार सोडले तर तुमच्या हृदयात प्रेमरस भरू लागेल. बाहेर पाउस बरसतच असतो..