Skip to main content

निरोधला विरोध!!!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 10/08/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

ब्राऊ..७..

लेखक गवि यांनी बुधवार, 10/08/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
3

महावीर बंडू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 10/08/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
हाती फिरवत गदेस गरगर बंडू फिरतो भरभर घरभर , येणा-जाणाऱ्यास तडाखे बाल महावीराचे शंभर ! सोफ्यावरून खुर्चीवरती - खुर्चीवरून फरशीवरती , उड्डाणातुनी जखमी होतो पराक्रमी तो बंडू असतो ! ढगांची गडगड कानीं येता

गुमराह

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 10/08/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.

पत्र

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 10/08/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय धनाजी राव, हे पत्र फक्त तुम्हालाच नाही.

आह्वाने - २

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 10/08/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मला आता पर्यंत दिलेली आह्वाने कुणितरी संकलीत करण्याची गरज आहे. जर आह्वाने पुरेशी गोळा झाली असतील तर पुढची प्रस्तावित पायरी ठरते ती "योग्य" आहेत की नाही हे ठरविण्याची. त्या साठी आवश्यक समितीच्या गठनाबद्दल आता विचार करू या. आता पर्यंत जमा झालेल्या २०-२५ पत्रिंका वरून निष्कर्ष नक्की काय काढला जाणार हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच.

चित्रचक्कर क्रमांक १ ते २३

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 10/08/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे.

मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं -

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 10/08/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं ) चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! नावेची सागरात, जोरात धडक होई एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई 'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! फसतो कोळी
काव्यरस

<<ज्योतिष - भाकीताचा पडताळा>>

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 10/08/2011 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसत माझे भाकित "दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल." पेपर म धली बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच... टिप - ही जाहिरात नव्हे

वामचा रस्सा आणि सुके (Eel fish)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 10/08/2011 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईकडे हि वाम एकदम आवडती पाकृ आहे. आमच्याकडे हिला "वाम" म्हणतात, पण ह्याला दुसरे काही नाव असल्यास मला महित नाही. हि वाम नदित व समुद्रातही सापडते. नदीतील वाम समुद्रातील वाम पेक्षा छोटी असते. परवा, इथे मार्केट मधे फिरताना मला हि एकदम fresh वाम मिळाली. एवढी fresh वाम बघुन मी फक्त त्या मार्केट मधे उड्या मारायचे बाकी होते. ;) घरी त्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी हेच होते. त्याचीच पाकृ इथे देत आहे.