माझ्या आईकडे हि वाम एकदम आवडती पाकृ आहे. आमच्याकडे हिला "वाम" म्हणतात, पण ह्याला दुसरे काही नाव असल्यास मला महित नाही. हि वाम नदित व समुद्रातही सापडते. नदीतील वाम समुद्रातील वाम पेक्षा छोटी असते.
परवा, इथे मार्केट मधे फिरताना मला हि एकदम fresh वाम मिळाली. एवढी fresh वाम बघुन मी फक्त त्या मार्केट मधे उड्या मारायचे बाकी होते. ;)
घरी त्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी हेच होते. त्याचीच पाकृ इथे देत आहे.
साहित्यः
वाम - फ्रेश वाम १/२ किलो
कांदा - १ मध्यम बारीक चिरुन
सुके खोबरे - १ मध्यम तुकडा किंवा १/४ कप किसलेले सुके खोबरे
कोथिंबीर - १/४ कप
बडिशेप - १ चमचा
धणे - १ चमचा
आले - १ इंच
लसुण - ५-६ पाकळ्या
हळद - २ चमचे
लाल तिखट - ४ चमचे
धणे पावडर - १ चमचा
हिंग - १ चमचा
लिंबु - १ सजावटीसाठी
मिठ चवीनुसार
कृती:
१. वाम स्वच्छ धुवुन त्याचे तुकडे करुन घ्यावेत. ह्या तुकड्यांना १/२ चमचा हळद व हिंग लावुन ठेवावा.
२. मिक्सर मधे कांदा, खोबरे, कोथिंबीर, बडिशेप, धणे , आले व २-३ लसुण पाकळ्या टाकुन एकदम बारीक वाटुन घ्यावे. हे वाटण खुप smooth वाटावे लागते.
३. कढई मधे तेल गरम करावे. त्यात २ लसुण पाकळया ठेचुन टाकाव्यात. त्या थोड्या परतल्यावर त्यात वाटलेले वाटण टाकुन परतावे.
४. वाटण थोडे परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट व धणे पावडर टाकावी. तेल सुटेपर्यंत वाटण परतावे.
५. तेल सुटल्यावर त्यात २-३ कप पाणी व चवीनुसार मिठ टाकावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळद व हिंग लावुन ठेवलेले वामचे तुकडे टाकावेत. हे माशे शिजायला जास्त वेळ लागत नाही पण रश्श्याला चव येण्यासाठी ५-१० मिनिटे हे उकळुन घ्यावे. रस्सा उकळताना तो चमच्याने हलवु नये, नाहितर सगळ्या तुकड्यांचा गाळ होइल.
७. आता हा रस्सा तयार झाला. ह्याला माझ्या आईकडे "कांजी" म्हणतात.
८. तुकड्यांचे सुके करण्यासाठी पहिले कढईतील कांजी दुसर्या पातेल्यात काढुन घ्यावा. पण कढईत २-३ चमचे कांजी आणि तुकडे तसेच ठेवावेत.
९. कांजीच्या पातेल्यात वामचा शेपटीचा किंवा तोंडाचा भाग असल्यास तो टाकुन ठेवावा आणि गॅसवर कमी आचेवर उकळत ठेवावा.
१०. आता कढईतील तुकड्यांवर १ चमचा कच्चे तेल टाकुन गॅस चालु करावा. त्यात वरतुन हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मिठ टाकुन निट परतावे. त्यातील रस्सा आटल्यावर वरतुन कोथिंबीर टाकुन गॅस बंद करावा. सुके टुकडे तयार आहेत.
११. असा गरम गरम कांजी, सुके तुकडे, गरम तांदुळाची भाकरी आणि भातासोबत खावा. ह्या पेक्षा दुसरा स्वर्ग नाही.
वाचने
458805
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
तिरफळे
In reply to छान by सहज
मी तरी कधीच ह्या रश्श्या मधे
In reply to तिरफळे by सुनील
अत्याचार करणा-यांची संख्या वाढत चालली आहे.
नाहि हो. इथे श्रावण पाळायला
In reply to अत्याचार करणा-यांची संख्या वाढत चालली आहे. by चिंतामणी
अरेच्चा. तु "तीथे" आसतेस नाही का.
In reply to नाहि हो. इथे श्रावण पाळायला by Mrunalini
मृणालिनी वाम छानच. कमी
कमी काट्यांमुळे आपल्याला जाम
In reply to मृणालिनी वाम छानच. कमी by इरसाल
आँ..?
In reply to कमी काट्यांमुळे आपल्याला जाम by गवि
हो. बारकी होती. जाड्या वाम
In reply to आँ..? by सोत्रि
हम्म्म...
In reply to हो. बारकी होती. जाड्या वाम by गवि
ओ काका...
In reply to हम्म्म... by सोत्रि
काका मला वाचवा...
In reply to ओ काका... by धमाल मुलगा
प्रकाटाआ
In reply to ओ काका... by धमाल मुलगा
ओ काका...????????????
In reply to ओ काका... by धमाल मुलगा
धन्यवाद. नदितील वाम
In reply to कमी काट्यांमुळे आपल्याला जाम by गवि
वावच
वाव/वाम कधी खाल्ला
आमच्या कडे ह्याला वोम किंवा
आयच्चा घ्घो!
सोय
In reply to आयच्चा घ्घो! by धमाल मुलगा
चालेल!
In reply to सोय by सोत्रि
पुण्यात किंवा मुंबईत असल्यास
In reply to चालेल! by धमाल मुलगा
:) :) :)
In reply to चालेल! by धमाल मुलगा
पुणेकऽर..
In reply to :) :) :) by सोत्रि
हाच एक मासा आहे जो आम्ही खात
मस्तच गं
मीपण हा मासा कधीच खाल्ला नाही
ताईंचा धागा मोजून सात
सध्या फ्याशन आहे जुने धागे वर
In reply to ताईंचा धागा मोजून सात by सतिश गावडे
वाम मीही कधी खाल्लेली नाही.