आरसा
माझाच चेहरा बघतो मी रोज,
हल्ली विद्रुपच..
बदळणारा - वेळो वेळी
पण पुन्हा - विद्रुपच
एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे,
चेहर्यावर -
आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत,
हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो,
-सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल
असहाय मी,
मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी.
पण, हा दोष आरस्याचा नाही,
हा दोष आहे माझ्या चेहर्यात,
जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही,
अंगवळणी पडलेले आजारपण,
आवडायला लागले आहेत.
प्रामाणिकता मात्र जगू देत नाही,
बदलायचा हट्ट सोडत नाही.
अन चीड येते माझीच मला,
उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला ,
काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास
पण नकळत,
पुन्हा तोच चेहरा बनवत
मिसळपाव