Skip to main content

आरसा

आरसा

Published on 16/08/2011 - 10:54 प्रकाशित मुखपृष्ठ
माझाच चेहरा बघतो मी रोज, हल्ली विद्रुपच.. बदळणारा - वेळो वेळी पण पुन्हा - विद्रुपच एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे, चेहर्‍यावर - आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत, हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो, -सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल असहाय मी, मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी. पण, हा दोष आरस्याचा नाही, हा दोष आहे माझ्या चेहर्‍यात, जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही, अंगवळणी पडलेले आजारपण, आवडायला लागले आहेत. प्रामाणिकता मात्र जगू देत नाही, बदलायचा हट्ट सोडत नाही. अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, पुन्हा तोच चेहरा बनवतो मी - कुरुप आरसाच माझा बनतो मी स्वहत:शीच पुटपुटतो मी दोष देत - असते रंगात सुद्धा भेसळ घेतो मी पांढरा - पण त्यास येते काळपट छटा! मात्र ह्या सार्‍या गोंघळात - बदलत असते माझी ओळख कधी होतो कवि आणि कधी होतो समाज मी.
लेखनविषय:

याद्या 1198
प्रतिक्रिया 3

निनाव -खूपच छान वाटली कविता . अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, हे छानच. .!!

निनाव -खूपच छान वाटली कविता . अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, हे छानच. .!!