Skip to main content

जागृत स्वप्न (भाग -१)

लेखक आत्मशून्य यांनी गुरुवार, 18/08/2011 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अल्केमि (किमयागीरी), हे एक शास्त्र आहे पदार्थ तयार करण्याचं, रचण्याचं. आणी तो मोडून पून्हा त्यातून काहितरी दूसरा नवीन पदार्थ निर्माण करण्याचं. म्हणूनच हे लोखंडापासून सोनं निर्माण करू शकत... पण हे एक शास्त्र असल्याने एका मूलभूत सिध्दांताला बाधील आहे आणी तो म्हणजे एखादी गोश्ट तयार करण्यासाठी तीतकेच समान मूल्य असलेली दूसरी गोश्ट गमावणे अत्यावश्यक आहे.... गावाबाहेरच्या टेकडीवर उभ्या असलेला माझ्या छोटेखानी परंतू दगडी गढीबद्दल लोकांना कधि फारसे आकर्षण न्हवतेच. मी मूद्दामच ती गढी गावापासून दूर अशा ठीकाणी राहता येण्यासाठी निवडली होती.

दिवस फुलपाखरी (भाग १)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 18/08/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच..

आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 18/08/2011 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता माझी नाहीं पण प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मिपाच्या कायद्यात बसत नाहीं. म्हणून संपादकांना असे करणे रुचले नाहीं तर अवश्य उडवावी! सुधीर काळे सुनीला गोंधळेकर यांची ही अप्रतिम कविता प्रत्येकाने वाचायलाच हवी! आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? यांना तुरुंगात घालायचं नाय, यांना बाहेर ठेवायचं नाय यांना बोलू द्यायचं नाय, मग गप्प करायचं काय? आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II१II जमली अवघड प्रश्नांची साय, खाली उकळत दुध हाय तोंड भाजून घ्यायचं का काय, जीभ दातात अडकली हाय आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?
काव्यरस

वादळाची जात अण्णा

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 18/08/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे
वादळाची जात अण्णा माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला? भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा एक आशेचा

पुरुष!

लेखक अभिजीत राजवाडे यांनी गुरुवार, 18/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझी कविता माझ्या आवाजात....मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते? पुरुष हवे आहेत... या देशाला हवे आहेत पुरुष, मानसिक पुरुषत्व असलेले पुरुष, शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात, वीजेसारखे आसमंत उजळवणारे पुरुष, निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी, स्मशानात पोहचवणारे पुरुष समरांगणात मारिता मारिता, तलवार वाकवणारे पुरुष सहानुभुतीवर थुंकणारे पुरुष, वादळांना फुंकणारे पुरुष, शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारे पुरुष, राष्ट्रासाठी हसत हसत म
काव्यरस

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा

लेखक जातीवंत भटका यांनी गुरुवार, 18/08/2011 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट सोमवार, म्हणजे जोडून सुट्ट्या आणि आमच्या सारख्या भटक्यांसाठी पर्वणी. पण नेमकी शनिवारी राखीपौर्णिमा आल्याने अखिल डोंगरयात्रा भगिनी मंडळामधल्या समस्त भगिनींनी वाडेश्वर मधे बैठा सत्याग्रह (मी त्याला खाद्याग्रह म्हणीन) मांडला. आणि जीवधन किल्ल्याला फाटा देऊन तीन दिवसांची मोहीम २ दिवसांवर आणली. या दोन दिवसात आम्ही दहा टाळकी कुकडनेरात (कुकडी नदीच्या खोर्‍यात) यथेच्छ भटकणार होतो. मी, श्रीकांत, शितल, प्राजक्ता, वृंदा, सतिश, प्रियांका, राहूल, गौरव आणि मयूर असा फौजफाटा जमा झाला होता. शनिवारी पहाटे ५.३० ला साखर झोपेत लवंडलेलं पुणं सोडलं आणि नाशिक हमरस्त्याला लागलो.