Skip to main content

मोराची चिंचोली

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 22/09/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
a अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.

पुनर्जन्म आणि कर्मविपाक

लेखक शरद यांनी बुधवार, 21/09/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जन्म आणि कर्मविपाक श्री. रमताराम यांनी लिहलेला लेख मनोरंजक होता. नावच "रमताराम" असल्याने त्यांनी "फिरस्त्या"सारखी "धर्म. समाज, जीवनमान, मौजमजा,.. विरंगुळा " इत्यादि विभागातून आपला लेख फिरवला. मजा आली. पण एक राहिलेच. "माहिती". पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग "एक चांगले कृत्य दुसर्‍या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? " असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही "माहिती" आहे, माझे मत नाही.

शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 21/09/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य शेझवान पोटॅटो: अर्धवट उकडलेले छोटे बटाटे अर्धे कापून घेणे (तुम्ही बटाट्याच्या जाडसर फोडी ही करु शकता) १ कांदा उभा चिरलेला २ टेस्पून बारीक चिरलेला लसूण (चायनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते, आपल्या आवडीप्रामाणे कमी-जास्त करणे) १ टेस्पून बारीक चिरलेले आले ५-६ लाल मिरच्या वाटून पेस्ट (मिरच्या गरम पाण्यात ३-४ तास भिजवणे व त्यातल्या बिया काढून मिक्सरवर पाणी न घालता वाटून घेणे) ३ टेस्पून कॉनफ्लोअर १ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार १ टीस्पून साखर १ कप व्हेज स्टॉक (पाणी ही वापरू शकता) १ टेस्पून सोया सॉ

BEHIND EVERY FORTUNE THERE IS A CRIME

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/09/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची उजळ बाजूच ठाऊक असते पण या उजळतेची काळी पार्श्वभूमी आपल्याला कळली तर किती धक्का बसतो याची उदाहरणे इथे देत आहे. http://beftiac.blogspot.com/ एका चित्रपटाच्या निर्मितीखर्चात दोन चित्रपट http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_21.html अशोक कुमार यांनी चित्रपटनिर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी आपल्याच राज्यातील एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला संधी दिली.

अर्घ्य

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 21/09/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ इतक्यात कशी झाली, काही कळलंच नाही. आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही. आणि अचानक अंधार झाला, मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा एकएक करून त्याही विझल्या.
काव्यरस

पाहटंची शेती

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेची शेती
सक्काळच्या धुक्यात रं चुलीचा धुर गेला रं भाकरी थापल्याचा आवाज त्याच्यात मिसळला रं पान्ह्यासाठी सोडली रं कालवड ल्हान तान्ही रं कासंडी धुवूनशान दूध काढलं म्हशीचं रं उठावं थंडीगारठ्याचं रं काम करावं कष्टाचं रं शेणमुत काढावं जनावरं आपलीच रं सर्जा राजा उठला रं पाचट खाऊन तयार रं औत वढाया, जुपाया खांद्यावर जू ठेवलं रं रामपारी देवाचं रं नाव घ्याव तोंडांनं रं न्यारी करून शेताला चालू लागावं पाहटंला रं - पाषाणभेद (दगडफोड्या) २१/०९/२०११

बत्तीस तारखेला

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 21/09/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
बत्तीस तारखेला


भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले