मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य शेझवान पोटॅटो: अर्धवट उकडलेले छोटे बटाटे अर्धे कापून घेणे (तुम्ही बटाट्याच्या जाडसर फोडी ही करु शकता) १ कांदा उभा चिरलेला २ टेस्पून बारीक चिरलेला लसूण (चायनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते, आपल्या आवडीप्रामाणे कमी-जास्त करणे) १ टेस्पून बारीक चिरलेले आले ५-६ लाल मिरच्या वाटून पेस्ट (मिरच्या गरम पाण्यात ३-४ तास भिजवणे व त्यातल्या बिया काढून मिक्सरवर पाणी न घालता वाटून घेणे) ३ टेस्पून कॉनफ्लोअर १ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार १ टीस्पून साखर १ कप व्हेज स्टॉक (पाणी ही वापरू शकता) १ टेस्पून सोया सॉस तेल . पाकृ: प्रथम अर्धवट उकडलेल्या बटाट्यांना कॉनफ्लोअर लावून डीप फ्राय करुन घ्या. . . एका पॅनमध्ये २ टेस्पून तेल घालून चिरलेला लसूण व आले घालून परता. . चांगले परतले की त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतणे. . त्यात वाटलेली लाल मिरची पेस्ट घालावी (आपल्याला तिखट किती सोसवेल त्याप्रमाणे) . चांगले परतले गेले की त्यात सोया सॉस व काळीमिरीपूड घालावे. . चवीपुरतं मीठ व साखर घालावी. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे) . त्यात आता १ कप व्हेज स्टॉक घालून उकळी आणावी.थोडेसे कॉनफ्लोअर पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घालावी, म्ह्ण्जे मिश्रण घट्ट होईल. . शेझवान सॉस दाट झाला की त्यात तळून ठेवलेले बटाटे घालावे व कितपत अजुन दाट हवे तसे शिजवावे. . त्यात थोडी चिरलेली कांद्याची पात घालावी. . आवडत असल्यास सॉस बनवताना आंबट्पणासाठी त्यात थोडे विनेगर घातले तरी चालेल. साहित्य व्हेज हक्का नुडल्सः १ पॅकेट हक्का नुडल्स १ वाटी पातळ व उभा चिरेलेला पानकोबी १ वाटी पातळ व उभा चिरेलेला गाजर १ वाटी पातळ व उभी चिरलेली भोपळी मिरची १/४ वाटी चिरलेली फरसबी २ पातीचे कांदे पातळ व उभे चिरलेले कांद्याची पात बारीक चिरलेली १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण १/२ टेस्पून बारीक चिरलेले आले मीठ चवीनुसार १ टीस्पून काळीमिरीपूड १ टेस्पून सोया सॉस तेल . पाक्रु: पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर तेल व थोडे मीठ घाला.उकळी आली की त्यात नुडल्स घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका, त्यावर थोडे थंड पाणी घाला व निथळत ठेवा. एका पॅन किंवा कढईत तेल गरम करून आले-लसूण घाला व परता. . त्यात चिरलेला पातीचा कांदा घालून परता. . आता त्यात फरसबी, गाजर व कोबी घालू परता.(पटापट परतायला हवे, आणी खुप वेळ नाही परतायचे, भाज्या थोडया कच्च्याच हव्यात ) . त्यात आता भोपळी मिरची घालून परता. . त्यात सोया सॉस, मीठ व काळीमिरीपूड घाला. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे) . त्यात शिजवलेल्या नुडल्स घालून परतणे व वरून चिरलेली कांद्याची पात घालणे. . व्हेज हक्का नुडल्स तयार. . गरमा-गरम हक्का नुडल्स शेझवान पोटॅटोबरोबर सर्व्ह करणे. .

वाचन 21137 प्रतिक्रिया 0