Skip to main content

नमस्कार मंडळी.

लेखक सोना-शार्वील यांनी बुधवार, 28/09/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपावच्या समस्त सदस्यांना माझा नमस्कार, ए़क विनोद संताने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उदास संता बंताला म्हणाला, यार... आधी माहिती असतं, तर लग्न पण कर्ज काढून केलं मिसळपाव वर माझा हा पहिले लिखाण आहे. तेव्हा चुक भुल देणे घेणे! सोना

नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 28/09/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://beftiac.blogspot.com/2010/12/behind-every-crime-there-is-injusti… काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे.

कप आणी बशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 28/09/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते.. आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे.. पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले.. आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो... एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात क

आज कुणीतरी येणार येणार ग......

लेखक चिप्लुन्कर यांनी बुधवार, 28/09/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकर हो ... कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि काही दिवसा पूर्वी माझ्या गाडी कोणती घ्यावी या धाग्यातील प्रतिक्रियांवर विचार करून मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे. आज संध्याकाळी तिला घरी आणावयाचा मानस आहे... तरी आपल्या सर्वांच्या खास करून स्पा , शाहीर , ५० फक्त यांचा जास्त आभारी आहे (ज्यांनी अवेंजर बद्दल जास्त चांगले मत व्यक्त केले) . आपला चिपळूणकर

शुभेच्छा !!!

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 28/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा ! अमोल केळकर ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ मला इथे भेटा

मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती

लेखक अजितजी यांनी बुधवार, 28/09/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ? आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का?

बालपणीचे निसर्ग सवंगडी

लेखक जागु यांनी बुधवार, 28/09/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल. चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्‍याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता.

कविता पुर्ण करुन हवी आहे...

लेखक धन्या यांनी बुधवार, 28/09/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. कसं काय बरं हाय ना? काही नाही हो, जरा एक कविता लिहित होतो. छ्या. तुमचं आपलं काहीतरीच. फक्त दहा वीस टक्के कवींनाच कविता स्फुरते. बाकीचे कविता पाडतात. आम्हीही या रटरट कवींपैकीच. म्हणजे र ला र आणि ट ला ट जुळवून कविता पाडणारे. कुणा थोरामोठयाने आमच्यासारख्या कवींना यमक्या कवी म्हणून उचित सन्मान केला आहे. काय म्हणता, रामदास की मोरोपंत यापैकी कुणीतरी ते म्हटलंय? जाउ द्या हो. इथे चावडीवर एकापेक्षा एक अभ्यासू लोकं आहेत. संदर्भ चुकला तर उगाच आपली पुजा बांधून आनंद शिंदेची रेकॉर्ड वाजवायचे. तुम्हाला चालेल का अशी द्विअर्थी गाणी वाजवून चावडीची प्रतिमा खालावलेली? अच्छा ते होय?