मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज कुणीतरी येणार येणार ग......

चिप्लुन्कर · · काथ्याकूट
समस्त मिपाकर हो ... कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि काही दिवसा पूर्वी माझ्या गाडी कोणती घ्यावी या धाग्यातील प्रतिक्रियांवर विचार करून मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे. आज संध्याकाळी तिला घरी आणावयाचा मानस आहे... तरी आपल्या सर्वांच्या खास करून स्पा , शाहीर , ५० फक्त यांचा जास्त आभारी आहे (ज्यांनी अवेंजर बद्दल जास्त चांगले मत व्यक्त केले) . आपला चिपळूणकर

वाचने 7489 वाचनखूण प्रतिक्रिया 37

स्वैर परी Wed, 09/28/2011 - 16:12
एकदम पर्फेक्ट चॉईस आहे! मागच्या आठवड्यात गोव्याला हिच घेतली होती आम्ही सगळ्यानी... रेन्ट वर... कसली भारी चालते.

In reply to by मृत्युन्जय

आणि मग १०० km रनींग झाल्यावर एक, १००० km, १०००० km, झाल्यावर एकेक असे धागे जरूर काढावेत अशी आमची सूचना आहे. च्यायला आपण दुचाकी घेतली हि केवढी आनंदाची गोष्ट, मग ती मिपावर नाही व्यक्त करायची तर कुठे? अवांतरः धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे. म्हणजे आपली क्रियेटीव्हीटी तुफानचं आहे. :D

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सूड Wed, 09/28/2011 - 17:29
>>धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे. अगदी अगदी !!

आधीच गाड्यांच्या प्रचंड संख्येने वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना, अजुन एका गाडीची रस्त्यावर भर घालून जनतेच्या हाल अपेष्टात वाढ केली आहेत आणि वर हा असला आनंद साजरा करत आहात ? स्वतःच्या सुखासाठी, मौजमजेसाठी घेतली ना गाडी ? मग एखाद्या आश्रमाला गाडी दान केल्यासारखे धागा काढून सांगण्यासारखे काय आहे ? उद्या लोक गंजीफ्रॉक घेतल्याचे धागे काढायला लागले नाही म्हणजे नशिब. असो... हे भारतीय लोक कधी सुधारायचे काय माहिती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विनायक प्रभू Wed, 09/28/2011 - 17:05
पराशी सहमत. अवेंजर बद्दल अभिनंदन. ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

In reply to by विनायक प्रभू

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 17:19
ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
च्यायला, कोलमडून पडलो मी... ;) मास्तर, दंडवत!!!

In reply to by विनायक प्रभू

विनायक प्रभू Wed, 09/28/2011 - 17:26
नव्याच्या नवलाईत काही महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित होतात हो श्रामो. म्हणुन आपला सल्ला दिला. बाकी कै नै.

In reply to by विनायक प्रभू

संपत Wed, 09/28/2011 - 22:20
अवेंजरमुळे क्रियेटीवीटीला त्रास होतो? सायकलमुळे होतो हे ठाउक होते पण मोटार सायकलमुळे होतो? प्रश्न गम्भिर आहे, उगाच खिल्ल्ली उडवु नये. :)

In reply to by संपत

माझ्या पाहण्यातील एक घटना:- एक जण अशाच एका जड मोटरसायकलवर बसून दोन्हीकडे दोन पाय टेकवून रस्त्यावर उभा होता. त्याच्या मागच्या आसनावर साडी परिधान केलेली एक महिला(दोन्ही पाय एकाच बाजुला टाकून) बसण्याचा प्रयत्न करीत होती. त्या महिलेची उंची कमी असल्याने तिला ते काहीसे अवघड होत होते. शेवटी ती एकदाची बॅक जंप मारून आसनावर बसली पण या उडीच्या झटक्याने मोटरसायकल एका बाजुला कलंडू लागली. अर्थात मोटरसायकलस्वाराने ती पडू दिली नाही परंतू त्यामुळे मोटरसायकलस्वाराला अवघड जागी इंधन टाकीचा जोराचा प्रहार बसला व तो असह्य वेदनेनी कळवळू लागला. शेवटी त्याला आजुबाजुच्या लोकांनी रिक्षात बसवून इस्पितळात नेले. पुढे काय झाले ते ठाऊक नाही, परंतू या घटनेवरून योग्य तो बोध घेऊन आधीच काळजी घेतलेली बरी.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शैलेन्द्र Sat, 10/01/2011 - 15:26
अग्गदी बरोबर.. छान निरीक्षन आहे तुमचे.. खरंतर पुर्वी बुलेट व तत्सम गाड्यांबरोबर, एक स्टुल, किंवा जीन्स घालणारी बायको(वा गफ्रें) फ्री द्यावी असा प्रस्ताव आम्ही दीला होता.. पण कंपणीने साडीगार्डवर बोळवण केली. बाकी इंधन टाकीचा प्रहार बसु नये म्हणुन वेगळा गार्ड कंपणीकडे मागावा का? तुम्ही म्हणत असलेली काळाजी बहुदा हीच असावी. चिप्लुन्कर घेतीलच ती काळजी..

In reply to by विनायक प्रभू

शैलेन्द्र Sat, 10/01/2011 - 15:31
"क्रियेटीवीटीला काही त्रास" होवु नये म्हणुन योग्य ठीकाणी योग्य मुडप दुडप व खाचा असलेले सीट मिळते.. त्याचा वापर श्री चिप्ळुन्कर यांनी करावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिल्पा ब Wed, 09/28/2011 - 23:46
तुम्हाला दुसर्‍याचं बरं बघवतच नै!!! गाडी कोणती घेउ असं त्यांनी इथंच धागा काढुन विचारलं होतं. आता त्यांनी कोणती गाडी घेतली हे नसतं सांगितलं तर तुम्हीच परत " इतकं धागा काढुन काय घेउ हे विचारलं आणि कोणता खटारा घेतला हे सांगायला बँडविड्थ कमी पडली का?" म्हणुन निषेध कराल. माणसानं वागावं तरी कसं!!

In reply to by शिल्पा ब

मृत्युन्जय गुरुवार, 09/29/2011 - 00:17
हो ना. आता गाडी अ‍ॅव्हरेज काय देते हे सांगितले नाही तरी हा परा शिव्या घालेल बिचार्‍यांना. तुम्ही त्याचाही एक धागा काढाच हो.

५० फक्त Wed, 09/28/2011 - 16:58
धन्यवादासाठी धन्यवाद, आणि धाग्याचं शिर्षक ' आज काही तरी आणणार आणणार गं' असं हवं होतं' असो, मी तर चेपुला असाच टाकलं होतं ' न्यु मेंबर कमिंग टु होम वेट @ १५० केजि' रंग कोणता ते सांगा, चेपुला एक ग्रुप आहे तो जॉईन करा तिथं मोलाची माहिती मिळते अजुन एक्सबिचपी पण आहे, ब्रेकं जपुन वापरा महत्वाचे बॅटरीवर मार्करने खुण करुन ठेवा, सर्विसिंगला दिल्यावर बॅट-या बदलणे हा मेकॅनिक लोकांचा आवडता छंद आहे जो आपल्या जीवाला पिसे लावतो, गाडीला किक नाही हे लक्षात ठेवणे. बॅटरी सगळ्यात महत्वाची. फोटो टाका इथं, माझ्या गाडीचे फोटो चेपुला आहेत. चला कोणीतरी समसुखी / दुखी मिळाला.

रेवती Wed, 09/28/2011 - 18:17
अ‍ॅव्हेंजरबद्दल ज्यांचे मत चांगले त्यांचेच खास आभार का बुवा? शिर्षक पाहून वेगळे अभिनंदन करायला आले होते. बाकी विप्रंबद्दल काही बोलायलाच नको. फिस्स््कन हसू आले. गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन!

विनायक प्रभू Wed, 09/28/2011 - 18:29
आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे. रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले. असो. चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?

In reply to by विनायक प्रभू

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 18:35
आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे. रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले.
मास्तर, किती ते... ;)

In reply to by श्रावण मोडक

चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?
चिप्लुन्करांचा पण 'मारुती कांबळे' होणार असे गुर्जींना म्हणायचे आहे काय ?

In reply to by इरसाल

>>>>>तुमचे दुर्लक्ष म्हणजे पामरांकडून काही प्रमाद कि आगळीक घडली काय ? अहो, आता याच्यात तुमच्या काय प्रमादाची गोष्ट आली ? च्यायला, हल्ली माझे साधे बोलणेही मला बंद करावे लागेल असे दिसते. कालच माझ्या एका मित्राने माझ्या साध्या बोलण्याचे मनावर घेऊन आपली खरडवहीची सुविधा बंद केली. :( बाईक कोणती घेऊ म्हणू चिप्लूणकरांनी धागा काढला होता. आता बाईक घेतल्यावर त्याच धाग्यावर बाईक घेतल्यामुळे पेडे वाटायला पाहिजे होते असे मला वाट्ले. आता कोणी आपल्या लेकराने शाळेत डबा खावा म्हणून कोणत्या प्रकाराचा डबा घेतला पाहिजे असा धागा काढला आणि पुन्हा डबा घेतला म्हणून सांगण्यासाठी दुसरा दोन ओळीचा धागा काढला तर ते बरे दिसणार नाही असे मला वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल Sat, 10/01/2011 - 20:13
अगदी अगदी. तुमच्याशी आम्ही वर्ल्ड कप पासूनच सहमत आहोत. सध्या आमच्या कडेही हेच चाललेय. पोरीला शाळेत मिड-डे मिल मिळते पण ती खात नाही म्हणून घरून पण डबा द्यावा लागतो. दुहेरी खर्च. काढू काय धागा ?

विनायक प्रभू Sat, 10/01/2011 - 18:05
हा इयत्ता ३ री त नको ती पुस्तके वाचल्याचा परिणाम किंवा प्रगल्भ मास्तर न मिळाल्याचा परिणाम. इथे हनीमुन ची वर्णने? काय झाले आहे काय तुला निळ्या? तुला हवी ती माहीती गुगळल्याने मिळलेच की.