कविता पुर्ण करुन हवी आहे...
राम राम मंडळी. कसं काय बरं हाय ना? काही नाही हो, जरा एक कविता लिहित होतो. छ्या. तुमचं आपलं काहीतरीच. फक्त दहा वीस टक्के कवींनाच कविता स्फुरते. बाकीचे कविता पाडतात. आम्हीही या रटरट कवींपैकीच. म्हणजे र ला र आणि ट ला ट जुळवून कविता पाडणारे. कुणा थोरामोठयाने आमच्यासारख्या कवींना यमक्या कवी म्हणून उचित सन्मान केला आहे. काय म्हणता, रामदास की मोरोपंत यापैकी कुणीतरी ते म्हटलंय? जाउ द्या हो. इथे चावडीवर एकापेक्षा एक अभ्यासू लोकं आहेत. संदर्भ चुकला तर उगाच आपली पुजा बांधून आनंद शिंदेची रेकॉर्ड वाजवायचे. तुम्हाला चालेल का अशी द्विअर्थी गाणी वाजवून चावडीची प्रतिमा खालावलेली? अच्छा ते होय? ओळखतो मी त्यांना. सातपूर यमायडीशीत असतात कामाला. मागे सातपूर यमायडीशीसह नाशिक पुणे मुंबई सुवर्ण चतुष्कोण आंदोलनात आम्ही दोघांनी लोकांना पेटवणारी गाणी म्हटली होती. अहो नाही हो. लोक उगाच पराचा कावळा करतात. काही चेतवणारी वगैरे नाही. तुम्हाला सांगतो, कवी ही जमात बदनाम केलीये या संस्कृतीगान वाल्यांनी. जरा कुठे काही सामान शब्द आला की ह्यांना भलतंच सामान दिसायला लागतं. सगळेच काही आमच्या गुर्जींसारखे किंवा नगरात निरंजन ओवाळणार्या आमच्या शैलेंद्रसारखे नसतात.
असो. तर मी काय म्हणत होतो. एक कविता लिहायला घेतलं दोन दिवसांपूर्वी. पण सगळं घास कडव्यांसारखं चालू आहे. गाय जशी रवंथ करत एकेक घास पचवते ना तसं आमच्या कवितेच्या कडव्यांचं झालंय. सोमवारी एक कडवं, मंगळवारी एक कडवं आणि आज बुधवारी एक कडवं अशी तीन कडवी लिहून झाली आहेत. म्हटलं अशी रोज एकेक कडवी लिहिण्यापेक्षा चावडीवर जाऊन हसत खेळत कविता पुर्ण करुन घेऊ या.
ही घ्या ती कविता. आणि होऊन जाउ द्या पुढची कडवी.
आतूरतेने कुणाची वाट पाहतो आहेस रे
आकाशीच्या चंद्राने एकदा विचारलं मला
म्हटलं येणार आहे रे कुणी तुझ्यासारखंच
शुभ्र चांदण्यांच्या गाडीतून मला भेटायला
एक छान हळूवार मंद वार्याची झुळूक येईल
झाडे पाने फुले तिच्या स्वागताला सजतील
अगदी अलगद उतरेल ती खाली, पण तरीही
ती खाली उतरताना पैंजण थोडेसे वाजतील
फुललेल्या मोगर्याचा गंध पसरेल वार्यावर
मेंदी भरलेल्या पावलांनी ती हळूवार चालेल
अन फुलण्याचा ऋतू नसतानाही गुलमोहर
तिच्यासाठी आरक्त लाल पायघडया घालेल
वाचने
6388
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आमचा आपला एक प्रयत्न
In reply to आमचा आपला एक प्रयत्न by ज्ञानोबाचे पैजार
अहो प्रयत्न उत्तम आहे. पण
In reply to अहो प्रयत्न उत्तम आहे. पण by गवि
गवि, सिच्युएशन लक्षात घ्या,
In reply to गवि, सिच्युएशन लक्षात घ्या, by ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या प्रतिभेला च्यालेंज
In reply to तुमच्या प्रतिभेला च्यालेंज by गवि
__/\__
In reply to तुमच्या प्रतिभेला च्यालेंज by गवि
_/\_
In reply to तुमच्या प्रतिभेला च्यालेंज by गवि
व्वा...
In reply to व्वा... by धन्या
हळु हळु
In reply to तुमच्या प्रतिभेला च्यालेंज by गवि
'ज्ञानोबां'च्या पैज़ारांनी नी
In reply to तुमच्या प्रतिभेला च्यालेंज by गवि
हहपुवा.
रे च॑द्रा
In reply to रे च॑द्रा by kamalakant samant
सामंत काका,
आमचा थोडा हातभार बघा चालतंय का ?
In reply to आमचा थोडा हातभार बघा चालतंय का ? by इरसाल
धावतंय...
In reply to धावतंय... by धन्या
आपका बहुतेही धन्यबाद. तुम्ही
लाल चुटुक उष्ण अधर. नजर नाचरी
In reply to लाल चुटुक उष्ण अधर. नजर नाचरी by अविनाशकुलकर्णी
लाजवाब
होउद्यात पुरी.. मग करु रस
आपल्या हातात नाजुकपणे धरलेली
फुललेल्या मोगर्याचा गंध
रामराम धनाजीरावचंद्र
In reply to रामराम धनाजीरावचंद्र by पाषाणभेद
कवितेबद्दल मत कळलेले नाही.
रिमझिमत्या चांदण्या अन मंद
In reply to रिमझिमत्या चांदण्या अन मंद by वपाडाव
मस्त रे
In reply to मस्त रे by प्रचेतस
पुढचा भाग ???
In reply to पुढचा भाग ??? by धन्या
उत्सुक मी