Skip to main content

अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातील रंगीबेरंगी हेमंत

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 21/10/2011 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
ही चित्रे अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातल्या रंगीबेरंगी हेमंताची आहेत. एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे.

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

गद्दाफी...लिबया....भारत......

लेखक मन१ यांनी गुरुवार, 20/10/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गद्दाफी हा आतापर्यंतचा लिबयाचा प्रमुख धरला गेल्याची बातमी येत आहे. आता लिबया म्हणजे काय? लिबया म्हणजे उत्तर आफ्रिकेतले एक अरब राष्ट्र. Moor नावाचे इस्लामी योद्धे म्हणे ह्याच भूब्व्हागाच्या आसपासच्या भागातून आख्ख्या युरोपवर चढाई करत गेले होते. आख्खा स्पेन्,पोर्तुगाल ह्यांनी इथून जिंकला व काही शे वर्षे नियंत्रणात ठेवला. भूमध्य समुद्राच्या काठावर, दक्षिणेला आफ्रिका खंड सुरु होतो. तिथे दोन देश इजिप्त आणि लिबया अगदि strategic location वर आहेत. युरोप, मध्य्पूर्व आशिया व आफ्रिका ह्या तीन्ही भूभागांची व समाजाची आपापली वैशिष्ट्य आहेत.

तुझ्या नजरेचा बाण !!

लेखक वपाडाव यांनी गुरुवार, 20/10/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
.... तुझ्या नजरेचा बाण, माझ्या दिलाची कमान , कधी करतो गं पार, याची मला नाही जाण ! ............... तुझी नाजुक ती डोळं, ............... रंग त्यांचा नीळाषार, ............... जेव्हा पाहती सावध, ............... होई मी तर घायाळ ! तुझी टपोरी ती अक्ष, त्यांचा तिरपा कटाक्ष, झाड - झुडुप न पक्षी, सर्व देती याची साक्ष ! ...............
काव्यरस

दिपावली २०११ : आवाहन.

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो! दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्‍यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्‍या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल.

दिपावली विशेष !!!

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता.

एक रम्य संध्याकाळ!!

लेखक मोहनराव यांनी गुरुवार, 20/10/2011 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो!! मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती. तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन.

रंगांच्या रेषा - ३

लेखक प्रभो यांनी बुधवार, 19/10/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
रंगांच्या रेषा रंगांच्या रेषा - २ गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे.

कॅरमलाईज्ड चिकन

लेखक गणपा यांनी बुधवार, 19/10/2011 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव. तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही. मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे. पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही.

ऑन लाइन शॉपिंग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 19/10/2011 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऑन लाइन शॉपिंग च्या व्यवसायाने चांगलेच बाळसे धरल्याचे दिसते. स्टार सी.जे.एन्डीटी,व्ही..टाईम्स..रेडिफ..एक ना दोन अनेक वेब साईत्स अनेक नावीन्य पूर्णं वस्तुंनी सजलेल्या दिसत आहेत.. इतर वेब साईट्स प्रमाणे ह्या वेब साईट्स पाहणे हा पण एक छान टी.पी आहे पूर्वी क्रेडिट कार्ड हे मस्ट असायचे पण आता कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय बहुतेक साईट्स वर उपलब्ध असल्याने खरेदी सोपी झाली आहे...शिवाय डेलिव्हरी घरपोच..मोफत किचन..संगणक..टी.व्ही..पादत्राणे...साड्या..