तुझ्या नजरेचा बाण !!
लेखनविषय:
काव्यरस
....
तुझ्या नजरेचा बाण,
माझ्या दिलाची कमान ,
कधी करतो गं पार,
याची मला नाही जाण !
............... तुझी नाजुक ती डोळं,
............... रंग त्यांचा नीळाषार,
............... जेव्हा पाहती सावध,
............... होई मी तर घायाळ !
तुझी टपोरी ती अक्ष,
त्यांचा तिरपा कटाक्ष,
झाड - झुडुप न पक्षी,
सर्व देती याची साक्ष !
............... तुझी सरसर चाल,
............... झुकलेली ती नजर,
............... खुलवितो तुझं रूप,
............... तुझा साज श्रृंगार !
कोपर्यातुन डोळ्यांच्या,
जेव्हा देतेस नजर,
सखे वाजतोय तेव्हा,
माझ्या दिलाचा गजर !
............... आणि किती दिस सये,
............... आता खेळायाचा हा खेळ,
............... काही मुखातून बोल,
............... कर मन हे मोकळं !
तुझा होकार ऐकिन्या,
जीव झाला सैरभैर,
तुझ्या एका हाकेसाठी,
माझं आयुष्य गहाण !
- काळे पुष्पक
Kale Pushpak
फार पुर्वी मराठी कवितावर प्रकाशित
वाचने
7524
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
आहाहा... आहाहा... आहाहा... ;)
शॉलिट्ट !
कविता छान !
कोपर्यातुन डोळ्यांच्या, जेव्हा देतेस नजर, सखे वाजतोय तेव्हा, माझ्या दिलाचा गजर !छान.
तुझी टपोरी ती अक्षअक्ष म्हणजे काय हे कळाले नाही, अक्ष म्हणजे नयन असा अर्थ आहे का ? अक्ष वरुन अक्स(प्रतिबिंब) आठवुन गेला.
In reply to कविता छान ! कोपर्यातुन by गणेशा
अक्ष म्हणजे नयन रे गणेशा,
पुढची ओळ वाच ना -त्यांचा तिरपा कटाक्ष. :)
वप्या एकदम सही सही कविता रे.
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !हे तर लैच भारी. अजून येउ देत.
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !सहीच !!! तोडलंस मित्रा !!!
मस्त... झकास... मनापासून आलंय..
दिलखेचक कविता आहे..
मदनबाण, मोहनराव, गवि, धना, वल्ली व गणेशा या सर्वांचे आभार !!!
व्वा व्वा! वपा...चांगलाच...डाव केलात हो।
तोडलस रे मित्रा!! ;)
मस्त झाली आहे रचना.. आवडली...
काय वर्मी बाण मारलास गड्या!
फारच अप्रतीम.......... लय झाक जमलीय..................
कोपर्यातुन डोळ्यांच्या,
जेव्हा देतेस नजर,
सखे वाजतोय तेव्हा,
माझ्या दिलाचा गजर !
ऐकून दिलाचा गजर,
कधी होशील ह्जर,
सखे तेव्हा होईल खरी दोघा॑ची नजरा नजर.................
In reply to फारच अप्रतीम.......... लय झाक जमलीय.................. by लीलाधर
वाह !!
छानच की....
वप्या, 'वयात आलास' हे बाकी चांगलं केलंस बरं.... ;)
या अप्रतिम कवितेला साजेसा एक फटू ईथे डकवू का रे वप्या???
त्या फोटोने तू वयात आलायसं हे पण सिद्ध होईल ;)
In reply to व्वा!! by मी-सौरभ
तो नाणेघाटातल्या ट्रेकमधला फोटो का रे? ओढ्यात काढलेला?? ;)
व्वा!! छुपे रुस्तम!!
साजेसा असा फोटू (पुणेरी हिरवळीचा) डकवला तर कविता दृश्य पण होईल.
बाकी दिवाळी च्या काळात अशा अजून फराळाची अपेक्षा.
कट्ट्यावर बसून पोरापोरांत गप्पा हाणताना एका वाफाळत्या कटिंग चहा सोबत कॉलेजवयीनाने आपल्या लाडक्या चालत्याफिरत्या महालाचे केलेले वर्णन वाटले.
एक शंका:- इथले प्रतिसाद पाहून हा धागा "Gents only" आहे काय अशी शंका आली.
In reply to झकास.... by मन१
एक शंका:- इथले प्रतिसाद पाहून हा धागा "Gents only" आहे काय अशी शंका आली.मी अजुन लेडीज मिपाकरांना आवतन दिलेले नाही... म्हुन कदाचित त्या मागे राहिल्या असतील.... बोलावुन आणतो आता एकेकीला.... ;)
मस्त वाजत आहे , गाजत आहे , दिसत आहे दिलाचा गजर..
लवकर होऊ द्या नजरा नजर ! छान वाटली कविता.
अरे बाप रे मस्त रे ,व प्या !
बोले तो सोल्लीड है भाय :)
मस्त झाली आहे रचना.. आवडली...
शब्दातून अख्ख चित्र डोळ्यासमोर उभ केलस तीचं.... जबरा.
वरील सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासुन धन्यवाद....
अन दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
छान नादमय रचना आहे.
फक्त "तुझा साज शृंगार" "आता खेळायाचा हा खेळ" या ओळींत मात्रांची ओढाताण होते आहे.
अर्रे वाचायची राहुन गेली होती तुझी कविता. चांगली जमलीय. काय झाले मग त्या 'कटाक्षा'चे पुढे? ;)
अरे वा...लई भारी कविता करता तुम्ही...
मस्त!!!
आवडली...
मेघवेडा, मृत्युंजय अन हरिप्रिया तिघांचेही आभार !!
छान लिहिले आहे
तुझी टपोरी ती अक्ष,
त्यांचा तिरपा कटाक्ष,
झाड - झुडुप न पक्षी,
सर्व देती याची साक्ष
आवडले.मस्तच ..!!
कुठून बाण आला म्हणायचा हा?
आपणा सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार.....
आपल्या प्रत्येक कलाकृतीला येथुन पुढे एकेक प्रतिक्रिया मोफत देणेत येइल.... ;)
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !क्या बात है क्या बात है ! अप्रतिम कविता वपाडावजी !
In reply to तुझा होकार ऐकिन्या, by प्रसाद गोडबोले
हेच म्हणतो.
In reply to तुझा होकार ऐकिन्या, by प्रसाद गोडबोले
उ.पा. केल्याबद्दल खुप खुप आभार...
कवितेतल्या ह्या ओळी मला सुद्धा सर्वात जास्त आवडतात…
मस्त!
मस्त मस्त....क्या बात है
हल्ली कूट असता आपुन!? व पाडाव? ;)
शांताबाई गाण्याची चाल परफेक्ट बसते आहे :)
In reply to शांताबाई by कपिलमुनी
त्यापेक्षा हुक्का बार ची चाल परफेक्ट बसतीय.
कभी आर कभी पार.
तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार
In reply to त्यापेक्षा हुक्का बार ची चाल by अभ्या..
होय की रे !
आत्ता म्हणून पाहिला !
वपाडाव , एखाद्या ट्रेक नाईटला म्हणानार ही कविता हुक्का बार स्टाईलमध्ये
अकु, प्रचेतस, कपिल्मुनि, डेडपुल, प्रगो व अभ्या ह्या सर्वांचे आभार
आहाहा... आहाहा... आहाहा...