Skip to main content

मीही कवि होणार!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 30/11/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्‍याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्‍या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला! होणार, मीही कवि होणार, छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार! यमक तेवढे ठाऊक मजला तितके पुरते कवी व्हायला अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा कचरा मी भरणार.. मीही कवि होणार कविता म्हणजे हवीच प्रीती द्विपुएव सर्वनाम चित्ती विशेषणांच्या खिरापतीने तुझे पोट भरणार..

<< बसकी >>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 30/11/2011 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी प्रेरणा : काही गरज नाही ब्वा ! किती जिलब्या ती तळते का हा कंड बघ की ते तुझ्या लिहीण्याने निल-ज्ञान वाढते मचाकीय लेखकांस शांतता मिळते संस्थळी आयुष्य आता बदलले प्रगल्भ चावट-गुणी जाहले किती तु अति बोर मारणार किती ह्या शब्दांस जाळणार बास कराकी आता सहन होत नाही धाग्यांची दैनंदिनी आता बघवत नाही
काव्यरस

सिंदबाद...

लेखक मन यांनी बुधवार, 30/11/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदबाद... एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची. अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं. हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया. वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव.

आवाहन: मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती?

लेखक amit_m यांनी बुधवार, 30/11/2011 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती? पुस्तकांबद्दल योग्य माहिती नसल्याने महाजालावर पुस्तके खरेदी करताना खुपदा गोंधळ होतो. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. कथासंग्रह, अनुवादित, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, अनुवादित ई. प्रकार चालतील.

गुपित

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 30/11/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे चिमुरड रोप दिवसभर आकाशाकडे तोंड करून काहीतरी बोलत राहतं ती भली मोठी निळी छत्री त्याच्याच मालकीची जणू ते सुद्धा खुशाल गोंजारतं त्याची सगळी गुपितं, हळूच दडवतं आपल्या पांढ-या शुभ्र दाढीत. आणि रात्री आपल्या प्रेमळ हातांनी झोके देत निजवतं त्याला अलगद. सकाळी उठून हे वेड पोर त्या छत्रीकडे बघून तोंडभर हसतं कोणास ठाऊक काय चालत दोघांच आपल्या आपल्यात… पण रोज सकाळी मला दिसते माझी बाग फुललेली!
काव्यरस

कोलावेरी डि

लेखक मिश्रेया यांनी बुधवार, 30/11/2011 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
रजनिकान्त च्या जावया ने'धनुष' ने गायलेले 'कोलावेरी डी' अर्थहिन असुन ही ऐकायला छान वाटते. त्याचे गाणे बघायला हि छान वाटते, गाणे शुट करताना पहायला मजा वाटली. ते इतके हिट झाले आहे की लगेच त्याचे मराठी व गुजराती वर्जन हि निघाले. छान च आहे. एकदा तरी ऐकावे. हल्ली काय हिट होइल आणी काय फ्लॉप होइल काही सान्ग्ता येत नाही. आधि 'सेनोरिटा' (ZNMD) हि असेच हिट झाले व त्याचे मराठि वर्जन हि लगेच आले.

कुपन मशिन

लेखक मिश्रेया यांनी बुधवार, 30/11/2011 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता ATVM मशिन चा वापर वाढावा म्हणुन रेल्वे ने कुपन मशिन बन्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधी त्यानी ह्या ATVM मशिन मुळात चालु आहेत का हे तरी पहावे न, घाइ च्या वेळी दोन्ही मशिन चा काहि उपयोग होत नाही. शेवटी कुपन वर स्टेशन वर तिथला शिक्का मारुन घेण्या शिवाय पर्याय नसतो. प्रत्येक स्टेशन वर दोन्ही मशिन आहेत, पण कार्यरत आहेत का?