Skip to main content

सामोसा/समोसा चाट

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 12/01/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य सामोसा/समोसा भाजी: ४ बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात १/२ वाटी उकडलेले मटारचे दाणे २ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जिरेपूड १ टेस्पून गरम-मसाला १ टीस्पून आमचूर पावडर (फोटोत नाही आहे पण पुढे कृतीत वापर केला गेला आहे ) १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार ५-६ कढीपत्ता तेल . पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन जीरे, कढीपत्ता,

एकदा तरी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 12/01/2012 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुटल्या तार्‍याची उल्का मी मी एक शलाका जलणारी राखेतिल सुप्त निखारा मी पाण्यातिल ज्वाला झुरणारी का व्हेट दिली का ओढ मला आशा अभिलाषा भाव उरी एकांत क्लांत विरही रात्री स्वप्नात होतसे गाठ जरी ह्या ध्यासाचे नच मोल तुला टांगते सदा मन अधांतरी मज आस प्रभाती रोज असे आलिंगशील एकदा तरी ..........................अज्ञात
काव्यरस

ढग भरल्या आभाळातून ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 12/01/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
ढग भरल्या आभाळातून पाउस पडो न पडो त्याना ह्याचे काहीच घेणे देणे नसते ह्यांच्या नळाला पाणी येतेय तेवढेच त्याना पुरे असते ... शेतकर्याचे काय झाले ..? शेतमजुरांचे काय झाले ...?? कसा देशोधडीला लागलाय ह्याना न काही घेणे देणे असते दुष्काळी कामासाठी ह्यांची सोय होतेय तेवढेच त्यांना पुरे असते कशी पोटासाठी येतात दुष्काळी प्रदेशातून ही अर्धपोटी माणसे कशी हवालदिल होऊन जातात ही माणसे ही पोरे ,ह्या बायका दुष्काळी कामासाठी दीड दमडीने विकली जातात कशी बळी पडते ह्या दुष्काळी भागातील एखादी स्त्री एखादी पोर .... कधीतरी ह्यांचे बिंग फुटते, नाही असे नाही पण हे पक्के बिलंदर असतात हे अलगद नाम
काव्यरस

कॅमेरा vs कॅमेरामन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/01/2012 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज). National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो.

कलचाचणी

लेखक भिकापाटील यांनी बुधवार, 11/01/2012 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------------------------------------------------- मित्रांनो आमची कंपनी ग्रामीण भागात सीएसाअर अंतर्गत पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यासाठी संगणक व तांत्रिक प्रशिक्षण देते. सीएसआर अंतर्गत ह्या महिन्यात दि. ३/१/२०१२ रोजी एका गावातील शाळेत दहावीच्या विद्यार्थांना कलचाचणी व करियर मार्गदर्शन आयोजन केले होते. दहावीनंतर्चे करिअर मार्गदर्शनासाठी मला आमंत्रण होते. दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कल चाचणी करिता पुण्याहून एका संस्थेतील तज्ञ शिक्षक आले होते. त्यांनी दि २/१/२०१२ रोजी चाचनी घेतली होती. ३ ता.ला कलचाचणीचा निकाल वाटप झाले.

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

इच्छा मरण

लेखक रघु सावंत यांनी बुधवार, 11/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला मरण यावे ते समुद्रात यावे एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे. कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट किंमत कमी करून मी दिली सारात सोडून त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे खोबरं लाल तिखट धण

‘निया’ मधल्या लाकडी पाट्या

लेखक ए.चंद्रशेखर यांनी बुधवार, 11/01/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.