त्रिशंकू
त्रिशंकू !
“जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला अजूनही चांगली आठवते. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडायची नाही. खरे तर आमच्या दोघांचेही व्यवसाय पूर्णपणे भिन्न.
मिसळपाव

