Skip to main content

आय.आय.टी. व एन. आय.टी.---प्रवेश

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 03/03/2012 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
खाजगी अभियांत्रिकी कॉलेजचा दर्जा बराच घसरला असला तरी आय.आय.टी व एन.आय.टी यांचा दर्जा अजूनही चांगला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ८ नवीन आय.आय.टी.ना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात आता १५ आय.आय.टी व २० एन.आय.टी आहेत. आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी बारावीनंतर IIT-JEE ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच बनारस हिंदू विद्यालय(IT-BHU)/ आय.एस.एम.धनाबादमध्ये याच प्रकियेतून प्रवेश दिला जातो.एन.आय.टी.मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी AIEEE हि परीक्षा द्यावी लागते.

गूगल translate कारनामा

लेखक किरन कदम यांनी शनिवार, 03/03/2012 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो , मी गूगल translation वरती काम करत होतो . सहजपणे मी हे राम type केले तर ,इंग्लिश मध्ये Jesus म्हुणुन निकाल दाखवला. मी चकित झालो.याला काय म्हणावे ?चूक कि मुदामून चूक करणे . हि चूक सुधारण्य साठी कुठे तकरार करता येते. माझा हे पहिले लेखन आहे . काही चुकले तर माफ करा. आपला मित्र kk Googleimage

आशियाड बसेसबद्दल काही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/03/2012 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो. राज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो.

संवाद करते मी विश्वेश्वराशी ..!

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 03/03/2012 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या प्रतिभेची लखलखती आभा . मान्यय माझी .. सांजावाती प्रभा :) तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका उध्वस्त राहु द्या माझी ही लंका :( सोन्याने सजावा हा तुमचा महाल सोडा हो चिंता, मी नाही बेहाल :cool: उजळावे दिव्यांनी तुमचे शिवार नकोय ते मला, चांदणे उधार :tired: तुमच्या दयेचा ना करते स्विकार उसन्या प्रतिमांचा त्रिवार धिक्कार , , सृजनआंगण फुलेल जेव्हां क्षितिजाला देईन धडका मी तेव्हां आकाशगंगेची फिरविन भिंगरी भिरकावून देईन गोवर्धन गिरी कशास करता हो तुलना कुणाशी संवाद करते मी विश्वेश्वराशी ..! :innocent: - संध्या

साजन चले ससुराल........

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 02/03/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
या घटेनेला आता दिड दोन वर्षं होतं आली. आजतागत हे गुपीत माझ्या बायको आणि मेव्हणी व्यतिरिक्त कुण्या चवथ्या व्यक्तीस माहित नाही. तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेची कृपया बाहेर कुठेही वाच्यता करु नका. मागच्या सुट्टीत एका भल्या पहाटे तांबड फुटायच्या आत अस्मादिकांच विमान मुंबापुरीत येऊन दाखल झाल. संपुर्ण विमान प्रवासात कधी नव्हे ते यावेळी राम नामाचा जप चालू होता. (कर्टसी गवि.) पुर्वी विमानतळावर जाताना वा तिथुन येताना नातेवाईक सहकुटुंब सोडायला/घ्यायला येत. पुढे पुढे माझ येण्या जाण्याच प्रमाण इतकं वाढलं तस रोज मरे त्याला कोण रडे.

खांदेरी जमला पण उंदेरी हुकला

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी शुक्रवार, 02/03/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर गेल्या वर्षी हा ट्रेक केल्यानंतरच फोटोवृत्तांत टाकायचा होता पण कामाच्या व्यापामुळे नाही जमले. तेव्हा गेल्या वर्षी होळीला केलेल्या ह्या ट्रेकचा हा फोटोवृत्तांत. लेख थोडा मोठा झालाय आणी फोटोपण लोड व्हायला वेळ लागेल कदाचीत पण हा एकच दिवसाचा ट्रेक होता म्हणून क्रमश: न टाकता सलग एकाच भाग टाकलाय. _________________________________________________ काही वर्षांपूर्वी जेव्हा खांदेरी-उंदेरी किल्ले कोण्या व्यावसाईकाला होटेल/मॉटेल बांधण्यास विकले हे वाचल्यानंतर ह्या किल्ल्यावर जायची ईच्छा बळावली.

वाट चुकलेली बस - एशियाड

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 02/03/2012 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा १९७० पासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे सामाजीक स्थित्यंतराच्या व्यवस्थापनाच्या फसलेल्या प्रयोगाचे एक नेमके उदाहरण आहे. सार्वजनीक व्यवस्थेवर पडणारा ताणामुळे सत्तरीच्या दशकात या शहराची शिवण उसवायला सुरुवात झाली होती. नव्या बदलाला जनता वेगवेगळ्या मार्गानी सामोरी जात होती. गिरगावातून इतर उपनगराकडे स्थलांतराला वेग आला होता . बॅकबेचा भराव संपत आला होता. नरीमन पॉइंटच्या बहुमजली इमारती उभ्या रहायला सुरुवात झाली होती. एका बाजूस अशी परीस्थिती तर दुसर्‍या बाजूस आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी भरभराटीला आली होती . १९७१ पर्यंत अनधिकृत झोपड्यांना विजेचा पुरवठा होत नव्हता.

गझल

लेखक हारुन शेख यांनी शुक्रवार, 02/03/2012 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
चाफेकळी नाक होते गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही हेच नशिबात होते (मि.पा.
काव्यरस