रोडी-९
एम टिव्ही (M Tv) वर दर शनिवारी रात्री ७ वाजता रोडी नावाचा प्रत्यक्ष चित्रण ( रियलिटी शो) होत असतो. बर्याच तरुण लोकांना तो आवडतही असतो असे माझ्या निदर्शनास आले आहे.
जवळपास मागच्या ९ वर्षापासून हा खेळ M Tv वर होत असतो आणि काही अनिच्छेनेच मी याचे छायाचित्रण पाहिले आणि मला हा खेळ, सादरीकरण आणि एकंदरीतच कल्पना आवडली.
कोणी हा खेळ या वाहिनीवर पाहत असेल तर त्याला याची बर्यापैकी कल्पना असेलच पण न पाहणार्यासाठी मी थोडाफार गोषवारा देऊ इच्छितो.
या खेळामध्ये ( फक्त) तरुण मुलामुलींचीच निवड होत असते.त्यासाठी याच्या आयोजकानी अनेक शहरातही प्रवास केला आहे. त्यासाठी गटाचर्चेची फेरी पार पाडावी लागते.
मिसळपाव