Skip to main content

डासांचे विजय गीत

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 27/05/2022 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. ) शूर वीर डास आम्ही बांधुनि कफन डोक्यावरी तुटून पडतो शत्रुंवरती त्यांचे रक्त पिऊनी देतो विजयी आरोळी. डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी करतो हल्ला माणसांवरती पाठवतो त्यांना यमसदनी. घाबरून आमच्या फौजेला मच्छरदानीत लपणार्‍या भित्र्या भागुबाई माणसांशी काहो करता तुलना आमुची. करू नका अपमान आमुचा पावसाळा आता दूर नाही. रक्ताची आहे भूक आम्हा रक्त पिऊनी माणसांचे देऊ विजयी आरोळी.

ब्लिडींग हार्ट....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/05/2022 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

विनिपेग डायरीज-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 25/05/2022 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा भाग-- विनिपेग डायरीज मागच्या भागात शेवटी समाप्त असे लिहिले होते. पण विचार करता करता असे लक्षात आले की अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे डोक्यात. शिवाय काही वाचकांनी पुढचा भाग टाकायची सूचना केली होतीच. तेव्हा सर्वांचा मान ठेवून हा भाग टंकायला घेतला. तर मीटिंगमध्ये विनिपेगचा मुक्काम हलवण्याचे ठरले आणि माझ्या डोक्यात भराभर चक्रे हलू लागली. आता ऑफिस आणि घर अशा दोन आघाड्यांवर लढाई चालू झाली. जरी विनिपेग ऑफिसात नसलो तरी मला पुढचे काही दिवस रिमोटली इथे सपोर्ट द्यायचा होताच.

इंद्रजाल

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/05/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
शतकातुनी एखादा रचितो कवि, शब्दांचा जमवुनी मेळ, कविता- जी करुनिया अचंबित विलक्षणाचा मांडी खेळ जेथ पोचुनी तर्क कुंठतो तीच वाट पकडे कवि तो इंद्रजाल शब्दांचे विणी -जे रसिक कधी भेदू न शकतो नित्य बदलते दृष्य दिसावे स्फटिक लोलकातून जसे वाचत असता ऐसी कविता पुन्हा नवी का भासतसे?

चिरकुट मुलगी--२

लेखक भागो यांनी मंगळवार, 24/05/2022 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकुट मुलगी--२ (चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273) “अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.” “लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.” जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला. “नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले. “जाम सुद्धा नाही?