Skip to main content

पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 24/04/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे पौराणिक विमाने, लिंगदेहाने केलेला मंगळग्रहाचा प्रवास इ. विषयी वाचून आमच्या मनाने घेतले, की आपणही असा प्रवास करावा, आणि प्राचीन काळचे जग कसे होते, ते बघावे... अमेरिकेच्या स्थूलदेहाने केलेल्या प्रवासात आम्हाला सर्वत्र एकसारखी शहरे, बाजारादि दिसले होते, परंतु आमची प्राचीनत्वाची हौस त्यातून भागली नव्हती...सूक्ष्म देहाने जावे ??? परन्तु कसे? आपण काही त्या थोर नर्तकांसारखे ब्रम्हर्षी वा प्रज्ञाब्रम्ह वगैरे नव्हे, मग हे जमायचे कसे? तेवढ्यात आठवले की मागे एकदा एका कठीण प्रसंगी आपण आपल्या दिवंगत माता-पित्यांना आवाहन केले होते, मग त्यांनी आवाहनास साद देउन मार्गदर्शन केले होते ...

देवदूत

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 24/04/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू थिजलेल्या पानावर थेंबाचे उजाड उघडेपण प्रवाशा हा रुतू असाच गहिरा आहे. पक्षांची थवेराने गेली त्या दिशेची आठवण जपलेली फांदी इथेही उरात निष्पर्ण... रिकाम्या क्षणापाशी हात जोडणाऱ्या प्रवाशा तुझ्या मागणीतील सखोलता व्यर्थ आहे. गंधपर्णी ओसरलेली वहिवाट, एकांताचा कडाका दिवसेंदिवस वाढतो ह्या मिठीला लागलेली उबेची गळती प्रवाशा पापण्यांवरील मिटण्याचा हक्क तू गमावला तर नाहीस? श्लोकोत्सवासाठी अजून किती उरलेत मंत्र? गात्रातील ही सहस्र बंड गर्जत आहेत देवदूत भेटणारे रस्ते वेगळे आहेत... (भयाने) प्रवाशा तुझ्या पाठीवर हे कोवळे पंख कसले आहेत?

आमचे पण कोकण दर्शन!

लेखक amit_m यांनी मंगळवार, 24/04/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आम्ही मे महिन्यामध्ये गुहागर, हरिहरेश्वर, चिपळूण इत्यादी ठिकाणे बघण्याची योजिले आहे. इंटरनेट आणि मिपावर शोधूनही ह्याविषयी जास्त माहिती मिळाली नाही. राहण्याची व्यवस्था आणि उपलब्धतेविषयी, ही ठिकाणे पाहिलेल्या मिपाकरांनी माहिती दिल्यास मदत होईल. प्रवासाचा तपशील खालीलप्रमाणे, एकूण व्यक्ती: ०४ (सहल कौटुंबिक आहे) प्रवासाला निघण्याचे व परतण्याचे ठिकाण: कोल्हापूर प्रवासाचे साधन: चारचाकी गाडी उपलब्ध दिवस: ४ ते ५ वर उल्लेख केलेल्या जागांव्यतिरीक्त आणखी काही बघण्यासारखे आहे काय?

नव्या कुटुंबाचं आगमन

लेखक जयवी यांनी मंगळवार, 24/04/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्‍याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं :) DSC00642-002" alt="" />

मदनबाण

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/04/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते.

गोव्यातली ठिकाणे

लेखक अँग्री बर्ड यांनी मंगळवार, 24/04/2012 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ह्यावर्षी कंपनीची annual meeting गोव्याला आहे. ३ मे रोजी विमानाने निघणार असून Marriott मध्ये उतरणार आहोत. ३ तारखेला म्हणजे बुधवारी मिटिंग होईल त्यानंतर दोन दिवस फिरणे हा कार्यक्रम असेल. माझ्या मते Marriott मिरामार बीच जवळ आहे. गोव्यात काही हटके offbeat ठिकाणे सांगू शकता का जी बघता येतील, जवळ water-sport कुठे आहेत, गवि यांनी त्यांच्या धाग्यात सुचवल्याप्रमाणे अस्सल गोव्याच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मार्टिन कॉर्नर्स मध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी जायचे ठरवले आहे. मग अजून काही ठिकाणे सुचवू शकाल काय ? धन्यवाद .

संस्कृती

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 24/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृती जाहली मरणप्राय जगवणारी तुरळक गणती मेली संस्कृती केंव्हाच सर्वत्र जाहिरात होती ll १ ll संपली, काळवंडली संस्कृती उजळवणारी तजवीज थोडी गाडून टाकणारी तिजला गर्दी संपत नव्हती ll २ ll जमवाया लोक जागृतीस मित्रास कळविला मोर्चा बघू उद्या म्हणाला हात दुरूनच केला ll ३ ll दुष्परिणाम प्रगतीचे तुडवीत संस्कुती होते मात्र लोकांना याचे अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll रक्षणास बोलावता आले उपायास नव्हते विकृतीचे बसता फटके ते मोर्चात सामील होते ll ५ ll - सार्थबोध

दुष्काळाच्या झळा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/04/2012 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळाच्या झळा दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा पुर्वप्रकाशित - पाषाणभेद
काव्यरस