Skip to main content

संस्कृती

मंगळवार, 24/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृती जाहली मरणप्राय जगवणारी तुरळक गणती मेली संस्कृती केंव्हाच सर्वत्र जाहिरात होती ll १ ll संपली, काळवंडली संस्कृती उजळवणारी तजवीज थोडी गाडून टाकणारी तिजला गर्दी संपत नव्हती ll २ ll जमवाया लोक जागृतीस मित्रास कळविला मोर्चा बघू उद्या म्हणाला हात दुरूनच केला ll ३ ll दुष्परिणाम प्रगतीचे तुडवीत संस्कुती होते मात्र लोकांना याचे अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll रक्षणास बोलावता आले उपायास नव्हते विकृतीचे बसता फटके ते मोर्चात सामील होते ll ५ ll - सार्थबोध
लेखनविषय:

वाचने 968
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

संस्कृती जाहली तरुण जगवणारी असती बक्कळ मेली संस्कृती जीर्णशीर्ण सर्वत्र नांदे नवसंस्कृती ll १ ll जन्मली, तरारली नवसंस्कृती उजळवणारी तरुण पिढी नवनवोन्मेशशालिनी सुवदनी नांदे घरा- घरातुनी ll २ ll वारू सुटले प्रगतीचे तुडवीत अंधभक्ती, अंधश्रद्धे लोकांना वाटे याचे बहु कवतिक ll ३ ll ऐसी भावना ठेविता तरुणपण राहे सर्वदा येरव्ही येई वृद्धता जाणावे निश्चित ll ४ ll

कविता वाचून हृदयाला घरे पडले. संस्कृतीला मरणप्राय करणारे स्वतःच मरणप्राय होवोत. जय हिंद जय महाराष्ट्र !