Skip to main content

करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/06/2022 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft. आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात.

बहारो फूल बरसाओ....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/06/2022 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है...... हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे. लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही.

वीस वर्षांनंतर (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी बुधवार, 15/06/2022 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
बीटवरचा पोलीस कडक रुबाबात रस्त्यावरून फिरत होता. ती त्याची रोजची सवयीची चाल होती. तो काही कोणाला रुबाब दाखवावा असा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याला पाहायला तिथे फारसं कोणी नव्हतंच. रात्रीचे दहा वाजत आले होते. थंड वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या. पावसाचा ओलावा दाटून आला होता. त्यामुळे रस्ते जवळजवळ निर्मनुष्य झाले होते. चालता चालता तो रस्त्यावरच्या दुकानांची दारं ढकलून पाहत होता. हातातली काठी छानशा लयीत फिरवत होता. अधूनमधून वळून आजूबाजूच्या शांत रस्त्यांवर जरबेची नजर टाकत होता. ताठ, दमदार पावलं टाकणारा तो दक्ष पोलीस म्हणजे जणू मूर्तिमंत शांततेचा रक्षक.

रायरेश्वर मोहीम

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 15/06/2022 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
रायरेश्वर मोहीम जून ११,१२, २०२२ Raireshwar महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सीमेवर असलेलं रायरेश्वर पठार हे इतिहासाच्या पानांमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहे.

आज्जी गेलीय सोडून

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 14/06/2022 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

ज्वाईनिंग लेटर....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 11/06/2022 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला. सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला. गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली. करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली. रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता. वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे. त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण". नाव काय तुझे? काको दानवाने विचारले. हवालदार बाकीच्यांना टाका आतमधे,याला इथेच सोडा.

विनिपेग डायरीज-३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 10/06/2022 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा.... झाले असे की जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा सगळ्यांना असे वाटले की हे काहीतरी टेक्निकल फोन्स, इ पी बी एक्स मेंटेनन्स, व्हॉइस रेकॉर्डिंग अशा प्रकारचे काम आहे.